शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

वडूजमधील धोकादायक तटभिंत पडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:46 IST

वडूज : शहरात अनेक इमारतींच्या भिंती धोकादायक बनल्या आहेत. अशा इमारतीच्या मालकांना नगरसेवक, नगरपंचायतीने लेखी नोटीस देऊनही दुर्लक्ष केले ...

वडूज : शहरात अनेक इमारतींच्या भिंती धोकादायक बनल्या आहेत. अशा इमारतीच्या मालकांना नगरसेवक, नगरपंचायतीने लेखी नोटीस देऊनही दुर्लक्ष केले जाते. यामुळे मंगळवारी झालेल्या पावसात वडूजमधील एका घराची तटभिंत पडली.

याबाबत माहिती अशी की, येथील लोकवस्ती असलेल्या भाग्योदय नगरातील एका निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बंगल्याची संरक्षक पाठभिंत काही वर्षांपासून धोकादायक स्थितीत होती. या परिसरात नागरिक वास्तव्यास आहेत. या मार्गावरील रस्ता रूंदीकरण आठ फुटीच असल्याने वाहतुकीच्या रहदारीसह येथील नागरिकांना चालणे कठीण बनत असते. तो बंंद बंगला पंचवीस वर्षे जुना आहे. त्याठिकाणी गाजर गवत साचून घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने घुस, साप, उंदीर यांचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.

याबाबत नागरिकांनी नगरपंचायतीकडे तक्रारी केल्या आहेत. प्रशासनाने संबंधितांना लेखी नोटीसव्यतिरिक्त कोणतीच ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांत असंतोष निर्माण झाला आहे. बंद बंगला व धोकादायक भिंतीमुळे नगरपंचायत कर्मचाऱ्यांना सावध कामकाज करावे लागत आहे. धोकादायक संरक्षक पाठभिंतीलगत निकृष्ट गटर बांधकामामुळे साचलेल्या पाण्यात अन्न शोधण्यासाठी विविध जनावरांचा राबता असतो.

वडूजमधील कर्मवीरनगर, गुलमोहर कॉलनी, सुयोगनगर, नवरत्ननगर, पंतनगर, मुख्य बाजारपेठ आदींसह अनेक भागात याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

फोटो ०७वडूज

वडूज येथे मंगळवारी झालेल्या पावसामुळे धोकादायक तटभिंत पडली. (छाया : शेखर जाधव)