शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या संदीप सुतारवर गुन्हा

By admin | Updated: September 18, 2014 23:29 IST

पोलिसांची नोटीस : पत्रकार अविनाश कोळींना जिवे मारण्याची धमकी

सांगली : ‘लोकमत’चे वरिष्ठ उपसंपादक अविनाश कोळी यांना शिवसेनेचा माजी जिल्हाप्रमुख संदीप सुतार याने जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. कोळी यांनी जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांच्याकडे धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर सावंत यांनी दिलेल्या आदेशानुसार सुतारविरुद्ध विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुतारने जिल्हाप्रमुख पदावर असताना शुभेच्छाची जाहिरात दिली होती. या जाहिरातीपोटी त्याने ३५ हजारांचा धनादेश दिला होता. मात्र हा धनादेश वठला नाही. त्यामुळे पुन्हा त्याने नव्याने धनादेश दिला. पण तोही वठला नाही. त्यामुळे ‘लोकमत’ने त्याच्याविरुद्ध सांगलीच्या न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी सुतारची जिल्हा प्रमुखपदावरुन उचलबांगडी केली आहे. गेल्या आठवड्यात (१२ सप्टेंबर) कोळी यांना सुतारने मोबाईलवर संपर्क साधून, ‘तुझ्यामुळे माझे जिल्हा प्रमुखपद गेले आहे, तुला जिवंत ठेवणार नाही. तुला संपविण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली आहे’, अशी धमकी दिली. तसेच शिवीगाळ करणारा एसएमएसही पाठविला होता. या प्रकारानंतर कोळी यांनी पोलीसप्रमुख सावंत यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. सावंत यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय भांगे यांना, चौकशी करुन तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सुतारविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)सुतारला नोटीससर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार पोलिसांनी सुतारवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्याला ७२ तासात पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. दरम्यान, पोलिसांनी आज (गुरुवार) या गुन्ह्याचा कसून तपास केला. कोळी यांना मोबाईलवर केलेले कॉल व शिवीगाळ करणाऱ्या पाठविलेल्या एसएमएसची प्रिंट ताब्यात घेतली.