आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:07 IST2021-01-08T06:07:54+5:302021-01-08T06:07:54+5:30

वाई : ओझर्डे (ता. वाई) येथील हेमंत दामोदर सोनावणे यांनी (दि. ३१) आत्महत्या केली होती. त्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त ...

Crime against a woman for inciting suicide | आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा

वाई : ओझर्डे (ता. वाई) येथील हेमंत दामोदर सोनावणे यांनी (दि. ३१) आत्महत्या केली होती. त्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त केल्याप्रकरणी वाई पोलिसांत रविवार पेठेतील महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाई पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की, वाई पोलीस ठाण्यात पत्नी सीमा हेमंत सोनावणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हेमंत सोनावणे यांनी दि. ३१ रोजी धावली गावच्या परिसरात गळफास लावून घेऊन आत्महत्या केली होती. हेमंत सोनवणे यांच्या खिशात चिठ्ठी सापडली होती. या चिठ्ठीमध्ये ‘माझ्या आत्महत्येस सर्वस्वी जबाबदार पूनम वैराट आहे. सीमा मला माफ कर, मुलांची काळजी घे, नाना-नानी यांची काळजी घे,’ असे लिहिले होते तसेच हेमंत सोनावणे यांना सतत लग्नासाठी तगादा लावणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक संजय मोतेकर हे तपास करत आहेत.

Web Title: Crime against a woman for inciting suicide