विवाहितेच्या जाचहाटप्रकरणी पतीसह दोघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:38 IST2021-03-21T04:38:16+5:302021-03-21T04:38:16+5:30

सातारा : मुंढेवाडी (ता. सातारा) येथे विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पती आणि सासऱ्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला ...

Crime against both husband and wife in marital harassment case | विवाहितेच्या जाचहाटप्रकरणी पतीसह दोघांवर गुन्हा

विवाहितेच्या जाचहाटप्रकरणी पतीसह दोघांवर गुन्हा

सातारा : मुंढेवाडी (ता. सातारा) येथे विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पती आणि सासऱ्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रविता प्रवीण मुंढे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पती प्रवीण चंद्रकांत मुंढे आणि सासरे चंद्रकांत धर्माजी मुंढे (दोघे रा. मुंढेवाडी, पो. जिहे, ता. सातारा) यांनी कारण नसताना आपापसात संगनमत करून शारीरिक आणि मानसिक छळ, जाचहाट केला. प्रवीता यांना अनेकदा उपाशी ठेवले तसेच हाताने, लाकडी दांडके आणि प्लॅस्टिकच्या पाइपने मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार २0१९ ते मार्च २0२१ या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी प्रविता यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर प्रवीण आणि चंद्रकांत या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार राजू मुलाणी करत आहेत.

Web Title: Crime against both husband and wife in marital harassment case