शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम साहित्य वीस टक्के महाग

By admin | Updated: June 30, 2014 00:40 IST

व्यावसायिक हवालदिल : वाळू, सिमेंट, खडीचा समावेश

अंजर अथणीकर ल्ल सांगलीवाळू, खडी, वीट व सिमेंट दरात अचानकपणे वीस टक्के वाढ झाल्याने बांधकाम व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. मे महिन्यानंतर बांधकाम हंगाम संपत असल्यामुळे दरवर्षी या कालावधित बांधकाम साहित्याचे दर उतरत असताना, यावर्षी मात्र पावसाळ्याच्या तोंडावरच बांधकाम साहित्य महागल्याने बांधकाम व्यावसायिकांबरोबर घराचे स्वप्न सत्यात उतरवू पाहणाऱ्या नागरिकांना धक्का बसला आहे. जिल्हा प्रशासनाने ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाळू ट्रकवर जोरदार कारवाई सुरु केल्याने बेगमपूर येथून मोठ्याप्रमाणात येणारी वाळू आता बंद झाली आहे. त्याचबरोबर वाळू वाहतूक व उपसा यासंदर्भात नियमांची कडक अंमलबजावणी सुरु केल्याने बाजारातील वाळूची आवक आता निम्म्यावर आली आहे. यामुळे वाळूचे दर ब्रासला तब्बल दोन हजारांनी वाढले आहेत. आता वाळूचा दर साडेपाच हजार ते सहा हजारच्या घरात गेला आहे. खडीचाही दर तीनशे रुपयांनी वाढला आहे. विटांचा दर (हजारी) १ हजार रुपयांनी वाढला आहे. तीन हजार दोनशे रुपयांचा दर आता ४ हजार शंभर रुपये (चार इंची) व चार हजार चारशे रुपये (सहा इंची) विटांचा दर झाला आहे. त्यामुळे घर बांधण्याच्या तयारीत असलेल्या लोकांना फटका बसला आहे.