शहरं
Join us  
Trending Stories
1
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
2
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
3
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
4
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
5
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
6
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
7
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
8
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
9
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
10
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
11
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
12
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
13
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
14
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
15
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
16
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
17
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
18
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
19
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
20
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचे मत मागवले, पण 'खाशाबां'ना पद्म पुरस्कार कधी? आज कोल्हापूर खंडपीठात सुनावणी

By प्रमोद सुकरे | Updated: May 7, 2026 11:54 IST

कुस्तीपटू खाशाबा जाधव मरणोत्तर पद्म पुरस्कार देण्याबाबतच्या प्रकरणात आज सुनावणी होणार आहे

प्रमोद सुकरे, लोकमत न्यूज नेटवर्क, कराड: भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदकविजेते दिवंगत खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार देण्याबाबत नव्याने प्रक्रिया सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री यांचे मत घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला दिले आहेत.तर या प्रकरणी गुरुवारी पुन्हा सुनावणी होणार असल्याने दिवंगत खाशाबा जाधव यांना पुरस्कार नेमका कधी मिळणार? असा सवाल क्रीडा प्रेमिकांच्यातून विचारला जात आहे.

मंगळवारी कोल्हापूरला याबाबत न्यायमूर्ती माधव जामदार व न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. केंद्र सरकारच्या वकिलांनी १५ मार्च ते ३१ जुलै या काळात ऑनलाईन स्व-नामांकन करावे. त्यामुळे २६ जानेवारी २६ रोजी जाहीर होणाऱ्या पुरस्कारांसाठी नव्याने अर्ज दाखल करावा असा युक्तिवाद केला. तर खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजीत जाधव यांचे वकील संग्राम देसाई यांनी याला विरोध केला. "आतापर्यंत ७-८वेळा आम्ही पद्म पुरस्कार समितीकडे अर्ज केले. पण विचार का झाला नाही, याचे कारणच कळले नाही. आता पुन्हा अर्ज मागणे हा अपमान आहे," असे देसाई म्हणाले. मुख्यमंत्र्यांपासून केंद्रीय मंत्री, खासदार व ऑलिम्पियनपर्यंत अनेकांनी शिफारस करूनही पुरस्कार का दिला नाही, असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, याबाबत गुरुवारी, ७ मे रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे.यावेळी नेमके काय होणार? याकडे कराड तालुक्यातील जनतेसह क्रीडाप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.

सन १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी कुस्तीत कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर ४४ वर्षांनी लिएंडर पेसने १९९६ मध्ये भारताला दुसरे वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. १९८४ मध्ये खाशाबांचे निधन झाले. आता मुख्यमंत्र्यांच्या मतानंतर पुढील निर्णय होणार आहे.  

तब्बल ७२ वर्षांची प्रतीक्षा, आता न्यायालयाचा हस्तक्षेप

दिवंगत खाशाबा दादासाहेब जाधव हे कुस्तीपटू होते. सन १९५२ मध्ये हेलसिंकी ऑलिम्पिक कांस्यपदक मिळवले.ते स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक होते. हा विक्रम १९९६ पर्यंत म्हणजे ४४ वर्षे अबाधित होता.पुढे खाशाबा जाधव यांचे १९८४ साली निधन झाले.त्यानंतर या पुरस्कारासाठी पुत्र रणजीत जाधव यांचा ४० वर्षांचा लढा सुरू आहे. ७/८ वेळा अर्ज केले. असंख्य शिफारशी जोडल्या पण तरीही दाद घेतली गेलेली नाही. आता न्यायालय म्हणते नव्याने प्रक्रिया सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे मत घ्या. पण २०२६ च्या स्वातंत्र्यदिनी तरी ‘ऑलिम्पिकवीर’ खाशाबांना पद्म सन्मान मिळणार का? याबाबत प्रश्न विचारला जात आहे.

सरकारचे वकील या पुरस्कारासाठी ऑनलाइन स्व स्व नामांकन करावे असे सांगत आहेत. पण स्व नामांकन करायला संबंधित व्यक्ती हयात असायला पाहिजे ना? खरंतर हा विषय आता खास बाब म्हणून करून घेण्याचा आहे. आतापर्यंत १०० पेक्षा जास्त वेळा याबाबत प्रस्ताव पाठवले आहेत. आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. तो सरकारने सकारात्मक घ्यावा असे मला वाटते.
- रणजित जाधव, खाशाबा जाधव यांचे पुत्र

English
हिंदी सारांश
Web Title : Court seeks CM's view on posthumous Padma for Khashaba Jadhav.

Web Summary : The Bombay High Court directs Maharashtra CM to consider Padma award for late Khashaba Jadhav, India's first Olympic medalist. His son opposes reapplying, citing prior rejections despite recommendations. The hearing resumes May 7th.
टॅग्स :Wrestlingकुस्तीpadma shri awardsपद्मश्री पुरस्कारChief Ministerमुख्यमंत्री