शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूरसह परिसरात पुन्हा ढगफुटी सदृष्य स्थिती, जोरदार पावसाने झोडपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 10:21 IST

Rain : एकाच रात्रीत मुसळधार पावसाने थैमान घातल्यामुळे आनेक ठिकाणी उपमार्ग जलमय झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. तर अनेक शेतात पावसाचे पाणी घूसून महामार्गालगतच्या शेतांचे नुकसान झाले आहे.

मलकापूर : मलकापूरसह परिसरात पुन्हा ढगफुटी सदृष्य पावसाने झोडपले. रात्रभर मुसळधार पावसाने धुमाकुळ घातल्यामुळे गोटे गावच्या हद्दीत व मलकापूरात डिमार्ट परिसरात पुणे- बंगळुरू महामार्गावर पाणी घुसल्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. एकाच रात्रीत मुसळधार पावसाने थैमान घातल्यामुळे आनेक ठिकाणी उपमार्ग जलमय झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. तर अनेक शेतात पावसाचे पाणी घूसून महामार्गालगतच्या शेतांचे नुकसान झाले आहे. 

मलकापूर परिसरात बुधवारी रात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली होती. बुधवारी दुपारनंतर तीन वाजण्याच्या सुमारास अचानक सगळीकडे ढग दाटून आल्याने दिवस मावळल्यासारखे वातावरण झाले. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक कांही क्षणातच ढगफुटीसदृष्य जोरदार पावसाने हजेरी लावली. सुमारे ११ तास पडलेल्या पावसामुळे मलपूरातील सर्वत्र पाणीच पाणी झाल्यामुळे नुकसान झाले आहे. रात्रभर झालेल्या दमदार पावसाने आगाशिव डोंगरावरून आलेल्या जोरदार पाण्याचा प्रवाह कोयनावसाहतसह विठ्ठलदेव सोसायटीतसह डिमार्ठ परिसरातून उपमार्गावरून महामार्गावर शिरले. कोयनावसाहत गेट ते एन पी मोटर परिसरात उपमार्गाला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते.  

आगाशिवनगरात झोपडपट्टीसह दत्त शिवम् कॉलनीतील कांही घरात रस्त्यांवरील पाण्याचा प्रवाह पुन्हा घुसला. आगाशिव डोंगरावरून अचानक पाण्याचा मोठा प्रवाह आल्यामुळे आगाशिवनगरात देवकर वस्ती ते पवार वस्ती परिसरात दुसऱ्या दिवशीही तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. यातून मार्ग काढताना वाहनधारकांसह नागरिकांना कसरत करावी लागत होती. तर ११ तास जोरदार पावसाने झोडपल्याने उपमार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामूळे दोन्ही बाजूचे उपमार्ग जलमय झाले होते.

उपमार्गासह कराड-ढेबेवाडी रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. मलकापूरसह परिसरात पुन्हा ढगफुटी सदृष्य पावसाने झोडपले. रात्रभर मुसळधार पावसाने धुमाकुळ घातल्यामुळे गोटे गावच्या हद्दीत व मलकापूरात डिमार्ट परिसरात पुणे- बेंगलोर महामार्गावर पाणी घुसल्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस