अरबवाडीच्या सरपंचपदी चित्रा चाफेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:53 IST2021-02-25T04:53:10+5:302021-02-25T04:53:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्यातील अरबवाडी गावच्या सरपंचपदी चित्रा चाफेकर यांची तर उपसरपंचपदी शक्ती शिंदे ...

Chitra Chafekar as Sarpanch of Arabwadi | अरबवाडीच्या सरपंचपदी चित्रा चाफेकर

अरबवाडीच्या सरपंचपदी चित्रा चाफेकर

लोकमत न्यूज नेटवर्क

वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्यातील अरबवाडी गावच्या सरपंचपदी चित्रा चाफेकर यांची तर उपसरपंचपदी शक्ती शिंदे यांची बिनविरोध निवड झाली.

बुधवारी सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी कुमठेकर यांच्या उपस्थितीत सरपंचपदासाठी चित्रा चाफेकर यांचा तर उपसरपंच पदासाठी शक्ती शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने चित्रा चाफेकर यांची सरपंचपदी तर शक्ती शिंदे यांची उपसरपंच पदासाठी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

माजी जलसंपदामंत्री आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने या ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व मिळविले होते. या पॅनेलच्या विजयासाठी माजी उपसरपंच संदीप भोसले यांनी परिश्रम घेतले.

या निवडीबद्दल नवोदित सरपंच, उपसरपंच यांचे आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषद कृषी सभापती मंगेश धुमाळ, निलेश जगदाळे, पंचायत समिती सदस्या साधना बनकर यांनी कौतुक केले.

Web Title: Chitra Chafekar as Sarpanch of Arabwadi