शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

...तर मुख्यमंत्री लढणार !

By admin | Updated: July 13, 2014 23:02 IST

संकेत : कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यास कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी

कऱ्हाड : ‘आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नेतृत्व मीच करणार आहे, असे ठामपणे सांगत असतानाच कार्यकर्त्यांचा आग्रह झाल्यास कऱ्हाड दक्षिणेतून स्वत: उभे राहण्याबाबत विचार करू,’ असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले़ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज, रविवारी कऱ्हाड दौऱ्यावर असताना त्यांनी जखिणवाडी येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार आनंदराव पाटील, जयकुमार गोरे, मदनराव मोहिते, डॉ़ इंंद्रजित मोहिते, जयवंत जगताप, धोंडिराम जाधव, शिवराज मोरे, आदींची उपस्थिती होती़ मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, सध्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे़ माझ्या नेतृत्वाखालीच त्या लढविणार आहोत़ राष्ट्रवादी अन्् आम्ही एकत्रितच लढू़ लोकसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेऊन आम्ही आमच्यातही काही बदल करवून घेणार आहोत़ उमेदवार निवडीचा पहिला अन् महत्त्वाचा टप्पा डोळ्यांसमोर आहे़ युतीचा कारभार जनतेने यापूर्वी अनुभवला आहे. म्हणून तर त्यांनी सलग पंधरा वर्षे आघाडीच्या हातात सत्ता दिली आहे. या निवडणुकीतही तसेच होईल. आपली कऱ्हाड दक्षिणेवरील स्वारीची तयारी सुरु आहे का? असे छेडले असता, ‘तसे काही नाही, कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधायचा होता म्हणून आलोय, असे ते म्हणाले; पण काल, शनिवारी जिल्हा काँग्रसने पक्ष निरीक्षकांकडे तुम्ही दक्षिणेतून लढावे, असा ठराव केलाय अन् कार्यकर्त्यांचीही अपेक्षा आहे, यावर ‘कार्यकर्त्यांच्या अपेक्षांचा जरूर विचार करू,’ असे उत्तर देत त्यांनी दक्षिणेतून लढण्याचे संकेतच दिले आहेत़ मुख्यमंत्री बदलाच्या बातम्या पेरणाऱ्यांचा शोध लागला का? असे विचारताच ‘काहींची नावे कळालीत. काहींची कळतील,’ असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)प्रथमच सोडले मौनकऱ्हाड दक्षिणच्या उमेदवारीबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज प्रथमच मौन सोडले. यापूर्वी पत्रकारांनी दक्षिणेवरील स्वारीबाबत त्यांना अनेकदा छेडले; पण त्याचे उत्तर देणे मुख्यमंत्र्यांनी खुबीने टाळले. गत आठवड्यात मुख्यमंत्री चव्हाण कऱ्हाड दौऱ्यावर होते, त्यावेळी पत्रकार परिषदेपूर्वीच संपर्कमंत्र्यांनी ‘स्थानिक काही विचारू नका,’ असे अगोदरच सांगितले होते. आज मात्र पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती करताच त्यांना दक्षिणच्या उमेदवारीबाबत आपले मौन सोडावे लागले अन् त्यांनी दक्षिणेतून लढण्याचे संकेतही दिले. भविष्यात छोटे-छोटे जिल्हे ‘कऱ्हाड जिल्ह्याचा प्रश्न बारामतीकरांमुळे अडलाय का?’ असे विचारताच ‘तसे काही नाही. ठाणेची लोकसंख्या मोठी होती. त्याचे विभाजन गरजेचे होते म्हणून तो पहिल्यांदा निर्णय घेतलाय. १ आॅगस्टला त्याची अधिकृत घोषणा होईल. १५ आॅगस्टपासून त्यांचा स्वतंत्र कारभार सुरू होईल; पण भविष्यात छोटे-छोटे जिल्हे करावेच लागणार आहे,’ असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.