शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

महाप्रसाद तपासा; परवान्याची सक्ती नको

By admin | Updated: August 19, 2014 23:44 IST

गणेशोत्सव : नागरिकांच्या आरोग्यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची सहकार्याची तयारी

सागर गुजर - सातारा  --गणेशोत्सवामध्ये भाविकांना देण्यात येणाऱ्या महाप्रसादावर आता अन्न व औषध प्रशासन विभागाची करडी नजर असणार आहे. अन्नदान करण्याआधी ‘एफडीए’ (अन्न व औषध प्रशासन) चा रितसर परवाना घेणे आवश्यक आहे. यावर शहरातील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एफडीए ने महाप्रसाद तपासावा, त्यानंतरच तो भाविकांना दिला जाईल. मात्र, परवान्याची सक्ती करु नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्यानुसार अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना परवाने बंधनकारक होते. मात्र, उत्सव साजरा करताना काही ठिकाणी विषबाधेचेही प्रकार घडले. सुदैवाने सातारा शहरात अशी एकही घटना आजतागायत घडलेली नाही. याबाबत साताऱ्यातील कार्यकर्ते अधिक दक्ष असतात. मात्र, संपूर्ण महाराष्ट्रासाठी अन्न व सुरक्षा व मानदे कायद्यानुसार उत्सवांतील अन्नदान करताना अन्न व औषध विभागाचे परवाने सक्तीचे करण्यात आले आहेत. यानुसार गणेशोत्सवातील इतर परवान्यांप्रमाणेच अन्न व औषध प्रशासनाकडून परवाना घेणेही आवश्यक करण्यात आले आहे. मंडळांना आधीच वेगवेगळे परवाने काढण्याची सक्ती प्रशासनाने केली आहे. महाप्रसाद करताना काटेकोरपणे कार्यकर्ते प्रयत्न करत असतात. जी मंडळे महाप्रसाद देणार आहेत. त्यांनी अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर या विभागाच्या अधिकाऱ्यांनी जागेवर येऊन अन्नाची तपासणी केल्यास ते सोयीचे होईल, असे काही मंडळांचे पदाधिकारी सांगतात. आरोग्याच्या दृष्टिने निर्णयाचे स्वागत होत आहे. महाप्रसादात लाडूसह फ्रूटखंडही सातारा शहरात गणेशोत्सवासह गणेश जयंती, महाशिवरात्री, नवरात्रोत्सव, हनुमान जयंतीनिमित्त सार्वजनिक मंडळांतर्फे महाप्रसाद दिला जातो. लाडू, शिरा, बुंदी, गव्हाची खिर, दूध, मलई यासोबत स्विट डिश, फू्रट सॅलिड, श्रीखंड, बासुंदी असे पदार्थ जेवणात दिले जातात. नागरिकांना महाप्रसादाचा आनंद मिळावा, या चांगल्या उद्देशाने भारुन ही मंडळी अन्नदान करत असतात. जिल्ह्यातील मोठ्या उत्सवांमध्ये होणाऱ्या महाप्रसादाची गुणवत्ता आम्ही नेहमीच तपासतो. अन्न व सुरक्षा मानदे कायदा नव्याने अमलात आल्याने आता सर्वच उत्सवांतील महाप्रसादासाठी परवाना घेणे आवश्यक आहे. - रामलिंग बोडके, सहायक आयुक्त, एफडीए गणेशोत्सवाच्या महाप्रसादामध्ये हजारो लोक जेवण करत असतात. दूधापासून बनविलेल्या पदार्थांतून विषबाधा होण्याची शक्यता असते. लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिने हा निर्णय योग्य वाटतो. मंडळाने याला सहकार्य करावे. - रवींद्र पवार, नगरसेवक उत्सवांमध्ये प्रशासनाकडून अनेक परवान्यांची सक्ती केली जाते. अन्न व औषध प्रशासनाने महाप्रसादाच्या ठिकाणी येऊन अन्नाची तपासणी करणे आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीसाठी परवाना घेणे मंडळांना अवघड जात आहे. - राजू गोडसे, सप्ततारा मंडळ