शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडमधील टोळीवर ‘मोक्का’अंतर्गत आरोपपत्र

By admin | Updated: December 10, 2014 23:47 IST

मयूर गोरे खूनप्रकरण : गुंड दीपक पाटीलसह सहाजणांचा समावेश

कऱ्हाड : मयूर गोरे खूनप्रकरणी ‘मोक्का’ कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आलेल्या गुंड दीपक पाटील टोळी विरुद्ध पुण्याच्या विशेष न्यायलयाच्या न्या. प्राची कुलकर्णी यांच्यासमोर काल, मंगळवारी दोषारोपपत्र सादर करण्यात आले. सहाजणांचा या टोळीत समावेश असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे यांनी दिली.
वैभव रमेश माने (वय २५, रा. कार्वेनाका, कऱ्हाड), दीपक भीमराव पाटील (३०, रा. आरळे, ता. पन्हाळा, सध्या रा. नांदलापूर, कऱ्हाड), श्रीयाल ऊर्फ गोट्या भीमराव धेंडे (२३, रा. वालनेसवडी, ता. मिरज), अनिल तानाजी माळी (२०, रा. कालेटेक, ता. कऱ्हाड), सागर खुबू पवार (२३, रा. लमाणतांडा, इस्लामपूर) व अभिजित दत्तात्रय विभूते (३४, रा. कालेटेक) अशी ‘मोक्का’ लावलेल्या आरोपींची नावे आहेत.
जखीणवाडी येथे ९ जून २०१४ रोजी मयूर मोहन गोरे या युवकाचा गोळ्या घालून निर्घृण खून करण्यात आला होता. नातेवाईक महिलेशी असलेल्या मैत्रीमुळे आपली बदनामी होईल, या भीतीपोटी वैभव माने याने सुपारी देऊन हा खून केला असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यानुसार १३ जून रोजी वैभव मानेला अटक करण्यात आली. त्यानंतर कुख्यात गुंड दीपक पाटील याच्यासह आणखी चारजणांना अटक झाली.
दीपक पाटीलच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यामार्फत कऱ्हाड पोलिसांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे (पान १ वरून) प्रस्ताव सादर केला. पोलीस महानिरीक्षकांनी या प्रस्तावाला मान्यता देऊन ११ सप्टेबर रोजी या टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई केली. त्याचा तपास पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे यांच्याकडे देण्यात आला. घट्टे यांच्यासह रमेश गर्जे, एस. ए. खान, सरदार नायकवडी, शशिकांत काळे या पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास केला. तपासादरम्यान सर्व आरोपींची पार्श्वभूमी, त्यांच्यावर दाखल असणारे पूर्वीचे गुन्हे तसेच शंभरहून अधिक साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले. अपर पोलीस महासंचालक के. एल. बिष्णोई यांनी तपासाची छाननी करून ८ डिसेंबर रोजी या गुन्ह्णात ‘मोक्का’ कायद्यांतर्गत दोषारोपपत्र सादर करण्यास तपास पथकाला परवानगी दिली. त्यानुसार उपअधीक्षक घट्टे यांच्यासह पथकाने मंगळवारी, दि. ९ पुणे-शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयाच्या न्य. प्राची कुलकर्णी यांच्या न्यायालयात या टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत दोषारोपपत्र सादर केले.



‘मोक्का’अंतर्गत दुसरी कारवाई
सातारच्या पोलीस अधीक्षकपदी डॉ. अभिनव देशमुख रुजू झाल्यापासून जिल्ह्यातील ‘मोक्का’ची ही दुसरी कारवाई आहे. यापूर्वी दहिवडी येथील एका टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असल्याचेही उपअधीक्षक घट्टे यांनी स्पष्ट केले.