शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

जिहे-कठापूरसाठी बदलला रेल्वेमार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:30 IST

सातारा : खटाव-माण तालुक्यांसाठी नवसंजीवनी ठरणारी जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजना अनेक छोट्या मोठ्या अडचणींमुळे रखडत होती. कधी जल आयोगाची ...

सातारा : खटाव-माण तालुक्यांसाठी नवसंजीवनी ठरणारी जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजना अनेक छोट्या मोठ्या अडचणींमुळे रखडत होती. कधी जल आयोगाची परवानगी नाही, तर कधी रेल्वे विभागाची परवानगी न मिळण्यामुळे काम पूर्ण होत नव्हते. अखेर या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू ‘गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे कठापूर उपसा सिंचन योजना’ असे नाव देण्यात आले आणि चक्क अडचणीतील परवानग्याही मिळत गेल्या. आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वांत महत्त्वाची घटना म्हणजे रेल्वेचा ट्रॅक उचलून बाजूला करण्यात आला. केवळ योजनेचे नाव बदलल्याने झालेला हा बदल सर्वांसाठीच आश्चर्यकारक असला तरी दुष्काळी भागातील लोकांसाठी लाभदायकच आहे.

माण-खटावमधील दुष्काळी भागातून शेतकऱ्यांचे कित्येक वर्षांचे स्वप्न साकार होताना दिसत असून, अनेक वर्षांपासून चर्चेत असलेली जिहे कठापूर उपसा जलसिंचन योजना तिचे नामकरण ‘गुरुवर्य लक्ष्मणरावजी इनामदार उपसा जलसिंचन योजना’ असे करण्यात आले आणि या योजनेचे महत्त्व वाढले. सध्या या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती लक्ष्मणराव इनामदार लोककल्याण चॅरिटेबल ट्रस्ट खटाव यांच्यावतीने देण्यात आली आहे. जिहे कठापूर येथील (बॅरेज ) बंधाऱ्याचे काम १०० टक्के पूर्ण झाले असून या योजनेच्या पंप हाऊसचे कामसुद्धा पूर्णत्वास गेले आहे. जिहे कठापूर ते नेर धरण संपूर्ण २३ किलोमीटर पाईपलाईन वर्धनगड घाट बोगद्यासह १०० टक्के पूर्ण झाली आहे. या योजनेस आवश्यक असणारा ४० केव्हीचा विद्युत पुरवठा प्राधान्याने मंजूर करण्यात येऊन तोही अंतिम टप्प्यात आहे. पाईपलाईन टेस्टिंग पूर्ण झाले असून त्या संदर्भातील अडचणी निराकरण करण्यात आल्या आहेत.

रेल्वे क्रॉसिंगच्या अडचणीमुळे लोहमार्गाखालून पाईपलाईन टाकणे अडचणीचे ठरत होते. पुणे-मिरज लोहमार्ग बंद करून क्रॉसिंग करता येत नव्हते. त्यासाठी विशेष परवानगीची गरज होती. अखेर लक्ष्मणराव इनामदार लोककल्याण चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे पुढाकार घेऊन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या मंत्रालयात केलेल्या पाठपुराव्यामुळे या कामाला मंजुरी मिळाली आणि १ जून ते १५ जून या कालावधीत आवश्यकतेप्रमाणे लोहमार्ग बंद करून काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे या प्रकल्पातील शेवटची अडचणही दूर झाली आहे. त्यासाठी संपूर्ण ट्रॅकच उचलून बाजूला करण्यात आला आहे. अत्यंत अवघड असे हे काम; पण मनात आणले तर काय होऊ शकते याचे प्रत्यंतर यातून मिळते. गेली ५० वर्षे या भागात पाणी येणार म्हणून वाट पाहणाऱ्या जनतेसाठी आता पाणी येण्याच्या आशा पल्लवित झाल्या असून येरळा नदी लवकरच वाहती होईल, असा विश्वास आहे.

फोटो ०३रेल्वे ट्रॅक

जिहे-कठापूर योजनेच्या पूर्ततेसाठी गोगावलेवाडीजवळ पर्यायी व्यवस्था करण्यात आली असून रेल्वे ट्रॅक उचलूनच बाजूला ठेवण्यात आला आहे. (छाया : केशव जाधव)