शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

खुर्ची मिळाली; गाड्या मात्र महिनाभर दूर !

By admin | Updated: September 23, 2014 00:14 IST

आचारसंहितेची आडकाठी : जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष वापरणार स्वत:चीच वाहने

सातारा : सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीवरून आठवडाभर खल सुरू होता. रुसवे-फुगवे दूर करत, गट-तट सांभाळत अखेर रविवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची माळ माणिकराव सोनवलकर तर उपाध्यक्षपदाची माळ रवी साळुंखे यांच्या गळ्यात पडली. दोघांनाही खुर्ची मिळाली; पण खरा रुबाब असणारी शासकीय गाडी मिळण्यासाठी किमान महिनाभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे.राजकारणात येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला महत्त्वाची सत्ता मिळावी, अधिकार मिळावेत, अशी अभिलाषा असते. त्यादृष्टीने वाटचाल सुरू होते. राजकारणातील सर्वच पदे प्रत्येकाला मिळतातच, असे नाही. सामाजिक आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर अनेक तळागाळातील लोकांच्या पदरात महत्त्वाची पदे पडली आहेत. त्याचप्रमाणे सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या अडीच वर्षांच्या दुसऱ्या टर्मच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी रविवारी निवडी झाल्या. तत्पूर्वीच शनिवारी राष्ट्रवादी भवनात निवडीसाठी बैठक झाली. त्यावेळी मंत्री शशिकांत शिंदे, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासमोर शिवेंद्रसिंहराजे भोसले वगळता सर्वच आमदारांनी भूमिका मांडली. त्यानुसार अध्यक्षपदासाठी शिवाजीराव शिंदे, सुभाष नरळे, माणिकराव सोनवलकर, आनंदराव शेळके-पाटील तर उपाध्यक्षपदासाठी अमित कदम यांचे नाव चर्चेत आले. खासदार उदयनराजे भोसले यांनी उपाध्यक्षपद मागितल्याने या निवडी रविवारी जाहीर करण्याचे ठरले. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत रामराजे गटाचे माणिकराव सोनवलकर तर उपाध्यक्षपदी खा. उदयनराजे भोसले गटाचे रवी साळुंखे यांची निवड करण्यात आली. ही निवड होत असतानाच अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. दोघांनाही जिल्ह्यातील महत्त्वाची असलेली व ग्रामीण भागातील मातीशी नाळ जोडणाऱ्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष-उपाध्यक्षपद मिळाले. खुर्ची मिळाली असली तरी विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्याने त्यांना सत्तेचा फारसा वापर करता येणार नाही. आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी या काळात कोणत्याही लोकप्रतिनिधीला शासकीय सुविधांचा वापर करता येत नाही. त्याप्रमाणे गाड्याही वापरता येणार नाहीत. तोपर्यंत अध्यक्ष-उपाध्यक्ष यांना स्वत:च्या खासगी वाहनांचा वापर करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)नव्या सरकारात मिळणार गाड्या...अनेक नाट्यमय घडामोडीनंतर रुसवे-फुगवे दूर करत अन् स्वत:च्या मार्गातील अडथळे दूर करत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अध्यक्षपदी सोनवलकर तर उपाध्यक्षपदी साळुंखे यांची निवड केली. ही निवड केवळ एका वर्षासाठी आहे. त्यातून सध्या विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे विधानसभेसाठी दि. १५ आॅक्टोबरला मतदान, तर मतमोजणी दि. २२ आॅक्टोबरला होणार आहे. त्यानंतर नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. त्यानंतर अध्यक्ष-उपाध्यक्षांना शासकीय गाड्या मिळणार असून, अधिकाराचा खऱ्या अर्थाने वापर करता येणार आहे. पहिला एक महिना विधानसभेसाठी उमेदवारांच्या प्रचारात जाणार आहे. त्यामुळे खूपच कमी कालावधी मिळणार आहे, हे मात्र निश्चित.नव्या सरकारात मिळणार गाड्या...अनेक नाट्यमय घडामोडीनंतर रुसवे-फुगवे दूर करत अन् स्वत:च्या मार्गातील अडथळे दूर करत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अध्यक्षपदी सोनवलकर तर उपाध्यक्षपदी साळुंखे यांची निवड केली. ही निवड केवळ एका वर्षासाठी आहे. त्यातून सध्या विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे विधानसभेसाठी दि. १५ आॅक्टोबरला मतदान, तर मतमोजणी दि. २२ आॅक्टोबरला होणार आहे. त्यानंतर नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. त्यानंतर अध्यक्ष-उपाध्यक्षांना शासकीय गाड्या मिळणार असून, अधिकाराचा खऱ्या अर्थाने वापर करता येणार आहे. पहिला एक महिना विधानसभेसाठी उमेदवारांच्या प्रचारात जाणार आहे. त्यामुळे खूपच कमी कालावधी मिळणार आहे, हे मात्र निश्चित.