शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

चाफळ विभागाची कोरोना मुक्तीकडे वाटचाल!, उपाययोजनांची कडक अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 12:45 IST

CoronaVirus Satara : पाटण तालुक्यातील चाफळ विभागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच त्याची संक्रमण साखळी खंडीत केली. यासाठी जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन केले. विशेष म्हणजे या चाफळ आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायिका भारती हांडे या काळात कोरोना बाधीत निघाल्या. कोरोनावर मात केल्यानंतर लगेचच रुजू होत गावोगावचे लसीकरण पूर्ण केले.

ठळक मुद्देउपाययोजनांची कडक अंमलबजावणी परिपूर्ण नियोजनामुळे पहिल्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण

चाफळ : पाटण तालुक्यातील चाफळ विभागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच त्याची संक्रमण साखळी खंडीत केली. यासाठी जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन केले. विशेष म्हणजे या चाफळ आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायिका भारती हांडे या काळात कोरोना बाधीत निघाल्या. कोरोनावर मात केल्यानंतर लगेचच रुजू होत गावोगावचे लसीकरण पूर्ण केले.कोरोनाने दुसऱ्या लाटेत सातारा जिल्ह्यात थैमान घातले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने विविध उपाययोजना राबवत सर्वत्र कडक लॉकडाऊन सुरू केले आहे. चाफळ विभागातही याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. पोलीस व महसूल विभागाच्या खांद्याला खांदा देत येथील आरोग्य विभागही जिवाची बाजी लावताना दिसत आहे. संपूर्ण डोंगर दऱ्याखोऱ्यात विखुरलेल्या चाफळ विभागात २२ गावे व २३ वाड्यावस्त्यांचा समावेश आहे. विभागातील बहुतांश गावे ही डोंगर कपारीत वसलेली आहेत. यातील १९ गावांत दुसऱ्या लाटेत कोरोनाने शिरकाव करत १४० जण बाधित आढळले होते.या कठिण परिस्थितीत कर्मचाऱ्यांची कमतरता असतानाही चाफळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य यंत्रणा कार्यरत होती. वाडीवस्तीवरील घरोघरो जावून विविध उपाययोजना राबवत जनसामान्यांत जनजागृती केली आहे. गावागावातील प्रत्येक नागरिकाला लसीकरणाचा पहिला डोस कसा देता येईल याचे योग्य नियोजन करत पहिल्या टप्यातील लसीकरण पूर्ण केले आहे.सध्या गावोगावी उभारलेल्या विलगीकरण कक्षाची पाहणी करत ग्रामस्तरीय दक्षता समितीसह आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. विलगीकरण कक्षातील कोरोना बाधितांवर वेळोवेळी औषधोपचार करत गावोगावी राबवलेल्या इतर उपाययोजनामुळे चाफळ विभागात कोरोनाची संक्रमण साखळी खंडित झाली आहे. आज संपूर्ण चाफळ विभाग कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. जिल्हा प्रशासनाने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा गौरव करण्याची मागणी चाफळ विभागातील ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर