शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: आसाममध्ये पुन्हा 'हिमंत' सरकार; आज शपथविधी
3
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
4
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
5
लग्नानंतर १४ व्या दिवशी नववधूचा मृत्यू; नवरा म्हणतो, "माझ्याशी मजा-मस्करी करत होती, अन्..."
6
जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
7
अण्णाद्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?, विधानसभेत आमदारांमध्ये दोन गट; मुख्यमंत्री विजय यांना पाठिंबा देण्यावरून वाद
8
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
9
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
10
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
11
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
12
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
13
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
14
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
15
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
16
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
17
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
18
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
19
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
20
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या कारभाराचा उद्योजक करणार पंचनामा

By admin | Updated: January 13, 2015 00:07 IST

दरवाढीचा निषेध : उद्योजकांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार

कुपवाड : अकार्यक्षमता, गळती आणि भ्रष्टाचार लपवून ठेवून महावितरण देशातील सर्वाधिक महागडा वीज दर उद्योजकांवर लादत आहे. त्यांच्या चुकीचे खापर ग्राहकांवर फोडून हा वाढीव वीज दर महावितरण पुढे रेटत आहे. या वाढीव वीज दरवाढीचा जिल्ह्यातील औद्योगिक संघटनांनी निषेध नोंदवून, माध्यमाद्वारे महावितरणच्या या भोंगळ कारभाराचा पंचनामा करण्याचा निर्णय आज उद्योजकांच्या बैठकीत घेण्यात आला. लवकरच यासंदर्भात आमदार सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांना भेटण्याचा निर्णयही औद्योगिक संघटनांनी यावेळी घेतला.महावितरणकडून वाढविण्यात आलेल्या वीज दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मिरजेतील सांगली, मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या सभागृहात जिल्ह्यातील उद्योजकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रतापराव होगाडे होते. आमदार खाडे, असोसिएशनचे अध्यक्ष संजय अराणके प्रमुख उपस्थित होते.यावेळी होगाडे म्हणाले की, देशात इतर राज्यांच्या तुलनेत दीडपट महाग वीज दर उद्योजकांवर लादला आहे. अकार्यक्षमता, गळती, भ्रष्टाचाराचा कळस महावितरणमध्ये झाला आहे. ही खोटी आकडेवारी टाळून महावितरणने उद्योग वाढण्यासाठी प्रयत्न करावेत.यावेळी कृष्णा व्हॅली चेंबरचे माजी उपाध्यक्ष सतीश मालू म्हणाले की, वस्त्रोद्योगाला ६५ टक्केच्या जवळपास वीज दरवाढ केली आहे. त्यामुळे वस्त्रोद्योग संपणार आहे. वसंतदादा सोसायटीचे अध्यक्ष सचिन पाटील म्हणाले की, नव्या वीज दरवाढीला स्थगिती द्यावी आणि जुन्या दरानेच वीज बिले भरून घ्यावीत.
उद्योजक दीपक शिंदे, पलूसचे उमेश पाटील, कृष्णा व्हॅलीचे उपाध्यक्ष रमेश आरवाडे आदींची भाषणे झाली़ संजय अराणके यांनी स्वागत केले़ सतीश वाघ यांनी आभार मानले़ यावेळी दीपक मर्दा, अनंत चिमड, प्रकाश शहा, पांडुरंग रूपनर, हेमंत महाबळ, विनोद पाटील, हर्षल खरे, के. एस़ भंडारे, विजय भगत, अण्णासाहेब कोरे, एस़ जी़ तायशेट्टी, गणेश निकम, विजय भोसले, अजय खांबे, बी. एस. सूर्यवंशी आदी उपस्थित होते़ (वार्ताहर)

माजी ऊर्जा सचिवावर हल्लाबोल...
खोट्या गळतीसह शेतकऱ्यांची बोगस आकडेवारी सादर करून गोलमाल करणारे माजी ऊर्जा सचिव अजय मेहता यांच्यावर आजच्या उद्योजकांच्या बैठकीत संघटनांकडून कडाडून टीका करण्यात आली. तसेच खाडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत वीज दर वाढीवर तोडगा न निघाल्यास जिल्ह्यात उद्योग बंदसह मोर्चा आदी आंदोलने करण्याचा निर्णयही यावेळी औद्योगिक संघटनांच्यावतीने सर्वानुमते घेण्यात आला.