शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

हातपंपाचे गढूळ पाणी विद्यार्थ्यांना !

By admin | Updated: September 17, 2014 22:26 IST

कुरणेवाडी : जिल्हा परिषद शाळेतील प्रकार

वरकुटे मलवडी : कुरणेवाडी, ता. माण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांसाठी पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय होत आहे. शाळेसमोर असलेल्या हातपंपाचे पाणी गढूळ व गंजयुक्त असे आहे. तरीही अनेकवेळा जेवण केल्यानंतर या मुलांकडून असे पाणी पिले जात आहे. यामुळे मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माण तालुक्यातील पूर्वेकडील शेवटचे टोक म्हटले की कुरणेवाडीचे नाव समोर येते. कुरणेवाडीपासून दोन किलोमीटरवर एका बाजूला सांगली जिल्ह्याची तर दुसऱ्या बाजूला पाच-सहा किलोमीटरवर सोलापूर जिल्ह्याची हद्द सुरू होते. वरकुटे मलवडीपासून कुरणेवाडी गाव हे सुमारे चार किलोमीटर अंतरावर आहे. सुमारे वीस वर्षांपूर्वी वरकुटे मलवडीमधून वेगळे होऊन कुरणेवाडी गावाची निर्मिती झाली आहे. कुरणेवाडी या गावची लोकसंख्या एक हजाराच्या पुढे आहे. या गावाला आजही कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नाही. गावाला नळपाणीपुरवठा योजना नाही. त्यामुळे मिळेल तेथून पाणी मिळविण्याचा प्रयत्न येथील ग्रामस्थांचा असतो. कुरणेवाडी येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. पूर्वी येथे फक्त चौथीपर्यंतच वर्ग भरत होते. अलीकडील काही वर्षांत येथे पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग भरतात. या जिल्हा परिषदेच्या शाळेसमोरच हातपंप आहे. या हातपंपाला सध्या गढूळ व गंजयुक्त पाणी येत आहे. येथील शाळकरी मुले ही जेवण झाल्यानंतर या हातपंपाचेच पाणी पित असतात. या पाण्यापासून मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांसाठी पाण्याची सोय करावी, अशी मागणी आता कुरणेवाडीतील पालकांतून होत आहे. (वार्ताहर)टाकीतील पाणी ग्रामस्थांसाठी...शाळेच्या आवारात पाण्याची टाकी आहे. परंतु ती नादुरुस्त आहे. त्यामुळे त्यामध्ये पाणीसाठा होऊ शकत नाही. मागीलवर्षी एका खासगी मालकाच्या विहिरीतून पाणी आणून टाकीत सोडले जात होते. मात्र आजूबाजूला असणारे ग्रामस्थ या टाकीतून पाणी घरगुती वापरासाठी नेत होते. सध्या येथील मुलांना दफ्तरामध्ये वह्या-पुस्तकांबरोबरच पाण्याच्या बाटल्यांचं ओझं घेऊन यावे लागत आहे.