वणवा लावल्याने दोघांना १० हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:39 IST2021-04-04T04:39:50+5:302021-04-04T04:39:50+5:30

चाफळ : पाटण तालुक्यातील चाफळ विभागात शुक्रवारी दुपारी पाडळोशी व जाळगेवाडी येथे खासगी जागेत लावलेली आग वन विभागाच्या ...

Both were fined Rs 10,000 for planting vanava | वणवा लावल्याने दोघांना १० हजारांचा दंड

वणवा लावल्याने दोघांना १० हजारांचा दंड

चाफळ : पाटण तालुक्यातील चाफळ विभागात शुक्रवारी दुपारी पाडळोशी व जाळगेवाडी येथे खासगी जागेत लावलेली आग वन विभागाच्या हद्दीत गेल्याने अनेक वन्य औषधे झाडे व जंगली सरपटणारे प्राणी या आगीत जळून खाक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. वणव्यांमध्ये कोट्यवधीची वनसंपत्ती जळून खाक होत आहे. मात्र आग आटोक्यात आणताना वन विभागाची धावपळ होऊ लागली आहे. दरम्यान, वणवे लावणाऱ्या जाळगेवाडी येथील दोघा शेतकऱ्यांचा शोध घेत कारवाई करण्यात आली आहे.

पाडळोशी व जाळगेवाडी येथील खाजगी क्षेत्रातील शेत जमिनीचे बांध व खाजगी मालकीच्या डोंगराला आग लावण्यात आली होती. ही आग वनविभागाच्या हद्दीत गेल्याने कोट्यावधी रुपयाची वनसंपदा जळून भस्मसात झाली. पाडळोशी येथील खाजगी क्षेत्रातील डोंगराला लावलेली आग ही धायटी, कांबळवाडी नजीक असलेल्या वनविभागाच्या हद्दीतील क्षेत्राला लागून असलेल्या खाजगी जागेत असलेल्या घराच्या दिशेने ही आग येऊ लागली होती. मात्र गावातील लोकांनी आग आटोक्यात आणल्याने अनेक घरे यामुळे वाचू शकली आहेत. तर जाळगेवाडी येथील मारुती ज्ञानू पवार व प्रवीण गणपत पवार हे पवार दरा नावाच्या शिवारातील शेताचा बांध जाळत असताना ही आग जंगल श्रेत्र गट नंबर ४४४ ला लागल्याने वन कर्मचारी व ग्रामस्थांची एकच धावपळ उडाली. वनश्रेत्रपाल वालास वाघमारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चौकशी करुन पवार कुटुबियांवर कारवाई करत अटक केली.

या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता दहा हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात आला. ही कारवाई वनरक्षक विलास वाघमारे व वनमजुरांनी केली.

चौकट

जाळगेवाडीतील वणवा लावणारे सापडले आता प्रतिक्षा आहे ती पाडळोशीकडे लावल्या वणव्यातील समाजकंटकांवर ठोस कारवाईची. वनविभाग पाडळोशीत वणवा लावलेल्या समाजकंटकाचा तपास करत आहे. विभागात यापुढे वणवा लावल्यास कठोर कारवाई करणार असल्याचे संकेत वनविभागाने दिले आहेत.

Web Title: Both were fined Rs 10,000 for planting vanava