शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

पिस्टल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:34 IST

सातारा : सुर्ली (ता. कऱ्हाड) येथील बसथांब्यावर गावठी पिस्टल बाळगणार्‍या एकाला सातारा एलसीबीच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले. त्याच्याकडून गावठी ...

सातारा : सुर्ली (ता. कऱ्हाड) येथील बसथांब्यावर गावठी पिस्टल बाळगणार्‍या एकाला सातारा एलसीबीच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले. त्याच्याकडून गावठी पिस्टल व ३ जिवंत काडतुसे असा सुमारे ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच त्याच्याकडे ज्याने पिस्टल ठेवण्यास दिले होते तो गंभीर गुन्ह्यात फरार असल्याचे समजले. त्यानंतर दुसर्‍या संशयितालाही वांगी (जि. सांगली) येथून पोलिसांनी अटक केली. अमोल जगन्नाथ माने (वय ३२, रा. वनवासमाची, ता. कऱ्हाड), संभाजी संपत मदने (रा. बनवडी कॉलनी, ता. कऱ्हाड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी, सुर्ली (ता. कऱ्हाड) येथील बसथांब्याजवळील परिसरामध्ये एकजण गावठी पिस्टल घेऊन फिरत असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. यानंतर या पथकाने सुर्ली बसथांबा येथे दि. ६ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास संशयित माने याला पकडून त्याची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्याकडे एक गावठी पिस्टल व ३ जिवंत काडतुसे सापडली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, हे पिस्टल व काडतुसे दुसर्‍या एकाने त्याच्याकडे ठेवण्यास दिली आहेत, असे सांगितले.

या अनुषंगाने खात्री केली असता, ज्याने पिस्टल ठेवण्यासाठी दिले होते, तो संशयित संभाजी मदने हा कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी नोव्हेंबर २०२०पासून फरार असून, तो वांगी (जि. सांगली) येथे असल्याचे पोलिसांना समजले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याठिकाणी जावून सापळा लावून मदने याला शिताफीने ताब्यात घेतले. या दोन्ही आरोपींविरुध्द कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, जोतीराम बर्गे, उत्तम दबडे, हवालदार सुधीर बनकर, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रवीण फडतरे, प्रवीण अहिरे, नीलेश काटकर, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, गणेश कचरे, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, विक्रम पिसाळ, रवींद्र वाघमारे, मंगेश महाडिक, अर्जुन शिरतोडे, अजित कर्णे, राजकुमार ननावरे, रोहित निकम आदींनी केली.

फोटो आहे