वाई येथे कृष्णानदी पत्रात आढळला वृद्धेचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:42 IST2021-09-26T04:42:39+5:302021-09-26T04:42:39+5:30

वाई : सोनगीरवाडी, वाई येथील मालन राजाराम सावंत ( वय ८०) यांचा कृष्णानदी पत्रात मृतदेह आढळून आला. ...

The body of an old man was found in the Krishnanadi letter at Wai | वाई येथे कृष्णानदी पत्रात आढळला वृद्धेचा मृतदेह

वाई येथे कृष्णानदी पत्रात आढळला वृद्धेचा मृतदेह

वाई : सोनगीरवाडी, वाई येथील मालन राजाराम सावंत ( वय ८०) यांचा कृष्णानदी पत्रात मृतदेह आढळून आला. याबाबत फिर्याद मुलगा दत्तात्रय राजाराम सावंत यांनी वाई पोलीस ठाण्यात दिली आहे.

वाई पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवार दि. २४ रोजी रोजी दुपारी तीनच्या सुमारास मालन सावंत या घरात कोणास काही न सांगता घरातून निघून गेल्या. घरी परत न आल्यामुळे नातेवाईक तसेच इतरत्र शोधाशोध केली असता सापडल्या नाहीत. दरम्यान, शनिवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास फुलेनगर परिसरातील कृष्णा नदीपात्रात मृतदेह आढळून आला. खात्री केली असता मालन सावंत या मृत्य पावल्याचे निष्पन्न झाले. वाई पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: The body of an old man was found in the Krishnanadi letter at Wai