शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

मास्क न लावणाऱ्या १०७ कर्मचाऱ्यांना पालिकेचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : साताऱ्यातील विसावा नाका येथील पामासो इंटरनॅशनल कंपनीला पालिका व पोलीस दलाने शनिवारी चांगलाच दणका ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : साताऱ्यातील विसावा नाका येथील पामासो इंटरनॅशनल कंपनीला पालिका व पोलीस दलाने शनिवारी चांगलाच दणका दिला. मास्क न लावता वावरणाऱ्या कंपनीच्या १०७ कर्मचार्‍यांकडून पथकाने २१ हजार ४०० तर फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३ हजार असा एकूण २४ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला.

सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तरीही अनेक नागरिक, दुकानदार, व्यापारी, विक्रेते मास्कचा वापर करत नसल्याचे व फिजिकल डिस्टन्स पाळत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. ही बाब कोरोना वाढीसाठी कारणीभूत ठरत असल्याने जिल्‍हाधिकारी शेखर सिंह यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश पालिका व पोलीस प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार गेल्या १५ दिवसांपासून पालिका व पोलीस दलाने संयुक्त कारवाई सुरू केली आहे.

येथील विसावा नाका परिसरात असलेल्या पामासो इंटरनॅशनल मार्केटिंग कंपनीची पालिकेचे कोरोना विभागप्रमुख प्रणव पवार, अतिक्रमण विभाग प्रमुख प्रशांत निकम यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी शनिवारी अचानक पाहणी केली. यावेळी कंपनीतील १०७ कर्मचारी विनामास्क वावरताना आढळून आले. तसेच फिजिकल डिस्टन्सचेही संबंधितांकडून उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे पथकाने मास्क न लावणाऱ्या १०७ कर्मचार्‍यांकडून प्रती २०० असा २१ हजार ४००, तर फिजिकल डिस्टन्सप्रकरणी तीन हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.