भुर्इंजच्या व्हर्टिगो स्ट्रॉबेरीची परदेशी पाहुण्यांनाही भुरळ

By Admin | Updated: November 28, 2015 00:21 IST2015-11-27T22:53:13+5:302015-11-28T00:21:47+5:30

नऊ गुंठ्यांच्या जागेत चार हजार सातशे पंचवीस थर्मोकोल पॉटचा वापर करून स्वीट चार्ली, फेस्टिव्हल, नाबिला व अ‍ेलबिआॅन जातीच्या एकोणीस हजार स्ट्रॉबेरी रोपांची लागवड

Bhurang's Vertigo strawberry embellish foreign tourists | भुर्इंजच्या व्हर्टिगो स्ट्रॉबेरीची परदेशी पाहुण्यांनाही भुरळ

भुर्इंजच्या व्हर्टिगो स्ट्रॉबेरीची परदेशी पाहुण्यांनाही भुरळ

भुईज : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर व्हर्टिगो पद्धतीने लागवड करण्यात आलेल्या स्ट्रॉबेरीच्या उत्पादनास प्रारंभ झाला आहे. या स्ट्रॉबेरीचा विक्रीप्रारंभ महाबळेश्वर तालुका फळे-फुले आणि भाजीपाला खरेदीविक्री संस्थेचे अध्यक्ष किसन भिलारे यांच्या हस्ते व कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला. यावेळी कारखाना भेटीस आलेल्या नेदरलॅँड येथील परदेशी पाहुण्यांनीही या स्ट्रॉबेरीची गोडी चाखली.पारंपरिक स्ट्रॉबेरी लागवडीला फाटा देत महाबळेश्वर येथील महाबळेश्वर तालुका फळे-फुले आणि भाजीपाला खरेदीविक्री संस्थेचे अध्यक्ष किसनराव भिलारे यांनी चार वर्षांपूर्वी व्हर्टिगो पद्धतीने स्ट्रॉबेरीची लागवड करून परिसरातील शेतकऱ्यांना दिशा दिलेली आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनाही अशा पद्धतीने स्ट्रॉबेरीची लागवड करता यावी, यासाठी कारखाना व्यवस्थापनाने कार्यस्थळावरील साखर भवनाच्या दक्षिण बाजूस नऊ गुंठे क्षेत्रामध्ये दोन महिन्यांपूर्वी व्हर्टिगो पद्धतीने स्ट्रॉबेरीची लागवड करून हा प्रयोग केलेला आहे. नऊ गुंठ्यांच्या जागेत चार हजार सातशे पंचवीस थर्मोकोल पॉटचा वापर करून स्वीट चार्ली, फेस्टिव्हल, नाबिला व अ‍ेलबिआॅन जातीच्या एकोणीस हजार स्ट्रॉबेरी रोपांची लागवड करण्यात आलेली आहे. दोन महिन्यांनंतर प्रत्यक्षात स्ट्रॉबेरीचे उत्पादन सुरू झालेले असून, त्याच्या विक्रीचा प्रारंभ शुक्रवारी करण्यात आला.
यावेळी कारखान्याचे संचालक नंदकुमार निकम, प्रकाश पवार, राहुल घाडगे, कार्यकारी संचालक एन. बी. पाटील, शिवराज भोसले, भोसले, नेदरलँडच्या स्टिव्हीयाचे रार्जर वाँट, कॅरल वाँट, किज फनदे लुदंत, किरण मोरे, बालाजी अचवले, जे. के. पाटील, तारीक बागवान, शेखर भोसले-पाटील, सुनील शिवथरे, संतोष ढाणे, शंकर पवार, मोहन पवार, अच्युत पवार, श्रीकांत साबळे, राजेंद्र पवार, ज्ञानदेव पवार, अंकुश पवार, विजय पवार, रवींद्र पवार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Bhurang's Vertigo strawberry embellish foreign tourists