खातगुण येथे रिंगरोडच्या कामाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:40 IST2021-02-11T04:40:59+5:302021-02-11T04:40:59+5:30

पुसेगाव : खातगुण (ता. खटाव) येथील अंतर्गत रिंगरोडच्या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांच्या हस्ते करण्यात आले. ...

Bhumipujan of Ring Road work at Khatgun | खातगुण येथे रिंगरोडच्या कामाचे भूमिपूजन

खातगुण येथे रिंगरोडच्या कामाचे भूमिपूजन

पुसेगाव : खातगुण (ता. खटाव) येथील अंतर्गत रिंगरोडच्या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांच्या हस्ते करण्यात आले. गावातील एस. टी. स्टँडपासून खटावकडे जाणारा रस्ता असे हे रिंगरोडचे काम आहे. यावेळी उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांच्यासह वसंत जाधव, विक्रम लावंड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते व ग्रामस्थ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

उपाध्यक्ष प्रदीप विधाते म्हणाले, ‘कोरोना महामारीमुळे गेले आठ - दहा महिने विकासकामे रखडली होती. आरोग्य सेवा ही प्राथमिकता असल्याने संपूर्ण यंत्रणेने त्यावर लक्ष केंद्रित केले होते. नागरिकांच्या सहकार्यामुळे कोरोना नियंत्रणात असून, आता विकासकामांनाही हळूहळू सुरुवात होत आहे. तसेच या पंचवार्षिक निवडणुकीत खातगुणच्या मतदारांनी परिवर्तन करून गावचा कारभार राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती दिल्याने आता गावातील विकासकामांना वेग येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिला.

फोटो : खातगुण (ता. खटाव) येथील रिंगरोडच्या कामाचे भूमिपूजन झाले. यावेळी प्रदीप विधाते, वसंत जाधव, विक्रम लावंड आदी उपस्थित होते. (छाया : केशव जाधव)

Web Title: Bhumipujan of Ring Road work at Khatgun