शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
3
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
4
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
5
Ashok Kharat : भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
6
अल्पवयीन प्रियकर-प्रेयसीला पकडलं, अमानुषपणे केस कापले अन् संपूर्ण गावातून धिंड काढून लावलं लग्न!
7
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
8
हिमंता बिस्वा सरमांच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये, सरमांच्या नेतृत्वाचं कौतुक करत म्हणाले...  
9
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
10
Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या कुटुंबात कोण कोण? अभिनेत्रीने शेअर केला फॅमिली फोटो
11
काय? राकेश बापटसोबत तेजश्री प्रधानच्या लग्नाची उडालेली अफवा, अभिनेता म्हणतो...
12
लग्नानंतर १४ व्या दिवशी नववधूचा मृत्यू; नवरा म्हणतो, "माझ्याशी मजा-मस्करी करत होती, अन्..."
13
जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
14
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
15
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
16
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
17
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
18
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
19
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
20
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिणेत भोसलेंचा वरचष्मा; उत्तरेत बाळासाहेबांचा करिष्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:39 IST

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी जाहीर झाले. एकंदरीत निकाल पाहता दक्षिण विधानसभा मतदार संघात भाजपचे नेते डॉ. ...

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी जाहीर झाले. एकंदरीत निकाल पाहता दक्षिण विधानसभा मतदार संघात भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांच्या समर्थकांची सरशी पहायला मिळत आहे. तर उत्तरेत पालकमंत्री बाळासाहेब पाटील समर्थकांचा करिष्मा कायम आहे. मात्र, काही ग्रामपंचायतीत झालेले सत्तांतर बाळासाहेबांना आत्मचिंतन करायला लावणारे आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यातील १०४ ग्रामपंचायतींचा बिगुल वाजला होता. त्यातील १२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. तर पाच ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्या. उर्वरित ८७ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी शांततेत मतदान झाले. उमेदवारांचे नशिब मशिनबंद झाले होते. त्याचा निकाल सोमवारी जाहीर झाला.

दक्षिण विधानसभा मतदार संघात ४२ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. त्याचे निकाल सोमवारी समोर आले. त्यामध्ये भाजपच्या डॉ. अतुल भोसले समर्थकांनी सरशी मारल्याचे स्पष्ट दिसते. खुबी, शेरे, नांदगाव, शेणोली, भैरवनाथनगर, काले, कार्वे, शिंदेवाडी, विंग, गोळेश्वर, कालवडे, जिंती, चचेगाव, धोंडेवाडी, मुंढे, कोडोली, वाठार या गावात भाजपने सत्ता मिळवली. तर बेलवडे बुद्रूक येथे भाजप व अ‍ॅड. उदयसिंह पाटील गट एकत्रित येऊन सत्ता मिळवली. खोडशीत डॉ. अतुल भोसले व मंत्री बाळासाहेब पाटील समर्थकांनी एकत्रीत येऊन सत्ता मिळविली आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांच्या मनोमिलनाचा तितक्या प्रमाणात प्रभाव ग्रामपंचायत निवडणुकांत पहायला मिळाला नाही. शिवाय स्थानिक कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सोयीच्या आघाड्यांना प्राधान्य दिल्याचेही दिसून आले.

कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदार संघात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा करिष्मा कायम असल्याचे निकालावरून दिसले. अनेक गावात राष्ट्रवादी अंतर्गतच दोन गटात लढत झाली. मतदार संघातील मोठ्या असणाऱ्या उंब्रजची सत्ता मंत्री पाटील यांनी कायम ठेवली. तसेच अनेक ग्रामपंचायतीमधील सत्ता त्यांच्या समर्थकांनी कायम ठेवल्या आहेत. मात्र, पाल, चोरे, पार्ले, बनवडी, कोणेगाव या ग्रामपंचायतीत बाळासाहेब पाटील समर्थकांना सत्ता राखता आली नाही. ही बाब त्यांच्यासह कार्यकर्त्यांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे.

- चौकट

... या गावात झालंय सत्तांतर

करवडी, नांदगाव, वहागाव, बेलवडे हवेली, वडोली निळेश्वर, शिंदेवाडी, बनवडी, कोणेगाव, रिसवड, तांबवे आदी गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तांतर झाले आहे.

फोटो : १८अतुल भोसले

फोटो : १८बाळासाहेब पाटील