शहरं
Join us  
Trending Stories
1
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
2
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
3
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
4
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
5
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
6
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
7
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
8
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
9
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
10
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
11
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
12
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
13
आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'अरबी'ला इंग्रजीत काय म्हणतात? ९०% लोक देतात याचे चुकीचे उत्तर! तुम्हाला माहितीये?
14
हा ब्लश नाही, महिलांना होणारा गंभीर आजार आहे; लुपस विकार ज्याने गर्भपातही होऊ शकतो
15
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
16
अंदमानमध्ये फक्त ₹१, तर तेलंगणात ₹३५; पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर लागतो? जाणून घ्या...
17
दरमहा २००० रुपयांच्या गुंतवणूकीवर रिटायरमेंटच्या वेळी मिळतील १.०८ कोटी; व्याजही फिक्स, कोणती आहे स्कीम?
18
बापरे! सुनेला सोन्याचे दागिने देण्यासाठी सासूने ओलांडली मर्यादा; घरमालकाच्या तिजोरीवर मारला डल्ला
19
कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
20
Ola Electric ची मोठी घोषणा; करणार २ हजार कोटींची गुंतवणूक, काय आहे कंपनीचा प्लॅन? 
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 18:16 IST

सातारा : सातारानगरीत उत्साहपूर्ण वातावरण, आतषबाजी आणि नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ...

सातारा : सातारानगरीत उत्साहपूर्ण वातावरण, आतषबाजी आणि नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. सातारा नगरपालिकेच्या वतीने शाहू चौकात उभारण्यात आलेल्या या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याने शहरात उत्साही वातावरण निर्माण झाले होते.

याप्रसंगी केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान, पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, आमदार महेश शिंदे, सुनील कांबळे, अमित गोरखे, नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष दत्ता बनकर, नगरसेवक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याच्या प्रती भेट देऊन स्वागत केले. यानंतर सातारा सैनिक स्कूल मैदानावर आयोजित घरकुल वितरण सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि लोकचळवळीतील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. अण्णाभाऊ साठे म्हणत असत की, ही पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर तोललेली नसून ती कामगारांच्या कष्टावर उभी आहे. समाजरचनेत कामगार चळवळीचे मोठे योगदान असून लोकचळवळीच्या या ऊर्जाकेंद्राला मी मनापासून अभिवादन करतो, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

पुतळा अनावरण सोहळ्यामुळे साताऱ्यात सामाजिक आणि सांस्कृतिक अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Anna Bhau Sathe Statue Unveiled in Satara by Chief Minister

Web Summary : Chief Minister unveiled Anna Bhau Sathe's statue in Satara amidst fanfare. Dignitaries paid tribute to his literary and social contributions, highlighting his impact on labor movements. The event fostered social and cultural pride in Satara, drawing large crowds.