शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम कामगारांना धनादेश वाटप

By admin | Updated: January 21, 2015 23:53 IST

शंकर पुजारी : कल्याणकारी मंडळातर्फे आयोजन

सिंधुदुर्गनगरी : निवारा बांधकाम कामगार संघटनेचे सभासद असलेल्या बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळाकडून पाच लाखांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. एकूण १२६ धनादेश वाटप करण्यात आल्याची माहिती बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकर पुजारी यांनी दिली.याबाबत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या हजारो सभासदांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकारी भवनावर मोर्चे, आंदोलने काढल्यामुळे अखेर हे पाच लाखांचे धनादेश प्राप्त झाले आहेत. अजूनही निवारा संघटनेने अर्ज केलेले ३० लाखांचे धनादेश निघावयाचे आहेत. जिल्हाधिकारी ई. रवींद्रन व कामगार अधिकारी शेखर पाडगावकरांनी कामगारांसाठी परिश्रम घेतल्याचे पत्रकात नमूद केले आहे.१२६ धनादेशांचे वाटप या धनादेशामध्ये इंजिनिअर शिष्यवृत्ती ३५ हजारांचे दोन धनादेश, एका मृत कामगारासाठी ५ हजार, दरमहा पेन्शन १ हजार रुपयेप्रमाणे साठ महिने, प्रसूतीचे १० हजारांचे २ धनादेश, सिझरिंगचे १५ हजारांचे दोन धनादेश, विवाहासाठीचे १० हजारांचे ४ धनादेश, एम.एस.सी.आय.टी. शिष्यवृत्तीचे सर्व फीचे दोन धनादेश, कॉलेज शिष्यवृत्ती १५ हजारांचा १ धनादेश, अकरावी आणि बारावीचे ५ हजारांचे ३ धनादेश, आठवी ते दहावीच्या लाभार्थी विद्यार्थ्यांना २४०० रुपयांचे २९ धनादेश, पहिली ते सातवीचे १२०० रुपयांचे ६४ धनादेश व गंभीर आजारासाठी २५ हजारांचे दोन धनादेश, अशा एकूण ५ लाख ७ हजार ५०० रुपयांचा समावेश आहे. हे सर्व लाभ मिळण्यासाठी व अर्जाची पूर्तता करण्यासाठी युनियनचे अध्यक्ष कॉ. शंकर पुजारी, जनरल सेक्रेटरी कॉ. विजय बचाटे, युनियनचे अध्यक्ष मंगेश नारिंग्रेकर, चंद्रप्रभा चव्हाण, सोनल नारिंगे्रेकर, मंगेश चव्हाण व निलिमा जाधव यांनी काम केले. धनादेश मिळालेल्या कामगारांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)