अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:27 IST2021-06-03T04:27:24+5:302021-06-03T04:27:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाई : वाई शहरातील लॉकडाऊन व कोरोना परिस्थितीचा मंगळवारी सायंकाळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी ...

Additional Superintendent of Police | अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी

अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी

लोकमत न्यूज नेटवर्क

वाई : वाई शहरातील लॉकडाऊन व कोरोना परिस्थितीचा मंगळवारी सायंकाळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांना ‘घरी रहा सुरक्षित रहा’ असे आवाहन केले. यानंतर त्यांनी मेणवली गावाला भेट देऊन तेथील पोलीस बंदोबस्ताची पाहणी केली.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मंगळवारपासून कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे मंगळवारी दिवसभर वाई शहरात शुकशुकाट होता. बुधवारी सकाळीही तीच परिस्थिती होती. मंगळवारी सायंकाळी अचानक अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी वाई शहराला भेट दिली. या भेटीत त्यांनी शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.

वाई शहरात बाहेरुन कोणी येऊ नये आणि वाई शहरातून बाहेर कोणी जाऊ नये, असे नियोजन केल्याचे वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी सांगितले. शहरात बंदोबस्ताकरिता ८० पोलीस कर्मचारी, स्ट्रायकिंग फोर्सचा बंदोबस्त ठेवला आहे. तसेच शहरातील किसनवीर चौक, परटाचा पार, सह्याद्रीनगर तिकाटणे आदी ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात आहेत. शहरात बाहेरुन येणाऱ्या वाहनांची नोंद केली जात असून, त्याचीही धीरज पाटील यांनी माहिती घेतली.

फोटो : ०२ वाई

अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी मंगळवारी वाई शहराला भेट देऊन पोलीस प्रशासन राबवत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. (छाया : पांडुरंग भिलारे)

Web Title: Additional Superintendent of Police