शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

लाकूड वाहतूक करणाऱ्यावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:55 IST

वाई : वाई तालुक्यातील भोगाव हद्दीतून टेम्पो (एमएच ११ एएल ५९८८) या गाडीतून सागवानी लाकडाची विनापरवाना वाहतूक करताना स्वप्नील ...

वाई : वाई तालुक्यातील भोगाव हद्दीतून टेम्पो (एमएच ११ एएल ५९८८) या गाडीतून सागवानी लाकडाची विनापरवाना वाहतूक करताना स्वप्नील प्रकाश बांदल (वय २५, रा. पाचवड) याला वन विभागाने गाडीसह ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो गाडीतून विनापरवानगी सागाच्या लाकडाची वाहतूक करताना आढळून आले आहे. या कारवाईत साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, प्रकाश बांदल हा बुधवार, दि. २४ रोजी वाईतील मोतिबाग परिसरातून कालव्यावरून टेम्पो (एमएच १२ एफसी ७३६१) या वाहनामधून विनापरवाना साग जातीच्या झाडांच्या लाकडाची वाहतूक करीत असताना, त्याच्यावर कारवाई केली. मालाची अंदाजे किंमत पाच लाख ५४ हजार असून मालासह गाडी ताब्यात घेतली. दोन्ही दिवशी केलेल्या कारवाईत ८ लाख ६९ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

वाई वन विभागाने धडक कारवाई केल्याने वाई तालुक्यातील बेसुमार वृक्षतोडीला लगाम बसणार आहे. वन विभागाने जागेवरच पंचनामा करून गाडी मालासह आरोपीला ताब्यात घेतले, अशी माहिती वन विभागाचे वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

ही कारवाई उपसंरक्षक भारतसिंह हाडा, सहायक वनरक्षक व्ही. बी. भडाळे, वाई वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंज परिमंडलाचे वनपाल सुरेश पटकारे, संग्राम मोरे, वनरक्षक वैभव शिंदे, सुरेश सूर्यवंशी, संदीप पवार, प्रदीप जोशी, संजय आडे, अजित पाटील यांच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.