शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

पाटणमध्ये ६३२ शेतकऱ्यांच्या कमरेला शस्त्र!

By admin | Updated: November 29, 2015 00:47 IST

जळी-स्थळी वन्यप्राण्यांची भीती : शेतीच्या रक्षणासाठी ३७७ परवानाप्राप्त बंदुकी

अरुण पवार ल्ल पाटण इतर तालुक्यांच्या मानाने पाटण तालुका शांतच. शस्त्रास्त्र तस्करी, अंमली पदार्थ किंवा गँगवार तालुक्यात औषधाला ही सापडणार नाही; पण तालुक्यात अशी व्यक्तिमत्त्वे आहेत की त्यांची कीर्ती राज्यभर आहे. दुसरीकडे दुर्गम, जंगली तालुका असल्यामुळे वन्यप्राण्यांकडूनच शेतीचे नुकसान चालूच आहे. शेती संरक्षणासाठी ३७७ शेतकऱ्यांकडे परवानाधारक बंदुका तर स्वरक्षणासाठीच्या परवान्यावर २५५ जणांकडे पिस्तूल, रायफल, बंदुका अशी स्वयंचलित शस्त्रे असल्यामुळे पाटण तालुक्यात शेतीबरोबरच स्वत:च्या रक्षणाची अनेकांना काळजी असल्याचे दिसते. पाटणच्या उपविभागीय कार्यालयाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून ३७७ शेतीसंरक्षणासाठी बंदूक परवाने व २५५ स्वरक्षणासाठी परवाने दिल्याचे स्पष्ट होते. काही शस्त्र परवानाधारकांनी आपले परवाने नूतनीकरण न केल्याचा शोध घेतला असता तब्बल ९७ जणांचे परवाने रद्द केल्याची कार्यवाही प्रांत कार्यालयाकडून सुरू असून, त्यांनी आपल्या जवळच्या बंदुका जमा करण्याचे आदेश बजावणार असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे आजोबा, वडील यांनी परवान्यावर खरेदी केलेल्या बंदुका त्यांच्या निधनानंतर अद्याप त्यांचेच नावावर परवाने आहेत. अशांचे परवाने रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सध्या वन्यप्राण्यांच्या शिकारीचा कायदा कडक झाल्यामुळे पूर्वीसारख्या जंगलात जाऊन शिकारी करण्याचा छंद अनेकांनी सोडून दिला आहे. त्यामुळे शेती संरक्षणाच्या नावाखाली गावोगावी हंटरमॅन म्हणून प्रसिद्ध झालेल्या व्यक्तींचे नामोनिशाण इतिहासजमा झाले आहे.