शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील ३८ मिळकती हेरिटेजमध्ये

By admin | Updated: August 19, 2014 23:44 IST

सातारा : १११ मिळकतींना मुख्याधिकाऱ्यांनी दिली क्लिन चिट

सातारा : शहरातील ऐतिहासिक व वास्तुशास्त्रीयदृष्ट्या वारसा असणाऱ्या ३८ इमारतींची यादी सातारा नगरपालिकेने प्रसिध्द केली आहे. १११ मिळतींवरील हेरिटेजची टांगती तलवार मुख्याधिकाऱ्यांनी दूर केली आहे. शासनाच्या नगरविकास विभागाने ९ जानेवारी २0१३ चा शासन निर्णयानुसार हेरिटेज नियमावली मंजूर केली आहे. एका संस्थेमार्फत शासनाने शहरातील मिळकतींची माहिती मिळवून एकूण १४९ मिळकती हेरिटेज वास्तूमध्ये घेतल्या होत्या. ही यादी प्रसिध्द झाल्यानंतर शहरातील अलिकडच्या काळात बांधलेली घरेही हेरिटेजमध्ये घेण्यात आल्याचे समोर आले. हेरिटेजच्या नियमानुसार या इमारतीची पुनर्बांधणी करताना शासनाचा प्रतिबंध येणार आहे. पालिकेने याबाबत हरकती मागविल्या होत्या. त्यानुसार १११ इमारती या यादीतून वगळण्यात आल्या आहेत. नवीन यादीनुसार अदालतवाडा, मंगळवार तळे, बहुलेश्वर मंदिर, गणेश्वर मंदिर, भटजी महाराज मठ, विठ्ठल रखुमाई मंदिर, महाकाली देवी मंदिर, प्रतापसिंह हायस्कूल, नवीन राजवाडा, दगडी इमारत, उत्तराभिमुखी मारुती मंदिर, भैरवनाथ मंदिर, जिल्हाधिकारी निवास, जिल्हाधिकारी कार्यालय, फोडजाई मंदिर, आॅफिसर्स क्लब, सेंट थॉमस चर्च, अमेरिकन चर्च, आंबेडकर निवास, पारशी आग्यारी, श्री राम मंदिर, श्री बालाजी मंदिर, बागडे विठ्ठल मंदिर, न्यू इंग्लिश स्कूल, फुटका तलाव, कमानी हौद, शाही मस्जिद, राजेश्वर मंदिर, टिळक मेमोरियल चर्च, उपविभागीय अधिकारी कार्यालय, सातारा जिल्हा कारागृह, पोलीस हेडक्वॉटॅर, दफन भूमी, रयत शिक्षण संस्था सयाजी हायस्कूल, कोटेश्वर मंदिर, बाजीराव विहिर, जलमंदिर या इमारती हेरिटेज वास्तू ठरल्या आहेत. या यादीत असलेल्या मिळकतधारकांना नियम ४.४ मधील तरतुदीनुसार प्रसिध्दी दिनांकाच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत संचालक, नगररचना महाराष्ट्र राज्य, पुणे सेंट्रल बिल्डिंग, स्टेशन रोड, पुणे १ यांच्याकडे अपील दाखल करता येणार आहे. (प्रतिनिधी)