बुधगावमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:25 IST2021-02-14T04:25:42+5:302021-02-14T04:25:42+5:30

सांगली : बुधगाव (ता. मिरज) येथे पूर्वीच्या भांडणातून तरुणास लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत, तलवारीने मारून गंभीर जखमी केले. या प्रकरणी ...

Young man beaten up in Budhgaon | बुधगावमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणास मारहाण

बुधगावमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणास मारहाण

सांगली : बुधगाव (ता. मिरज) येथे पूर्वीच्या भांडणातून तरुणास लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत, तलवारीने मारून गंभीर जखमी केले. या प्रकरणी सुनील विठ्ठल तडसरे (वय ३६, रा. लक्ष्मीनगर, बुधगाव) याने रोहित पाटील, राेहन पाटील, अभिजित जाधव, चेतन जाधव (सर्व रा. बुधगाव) यांच्याविरोधात ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास फिर्यादी सुनील हा आपल्या मुलासह घराजवळ असलेल्या जय हनुमान मंडळ मैदानावर बसला होता. यावेळी संशयित तिथे आले व त्यांनी पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून त्याला जाब विचारण्यास सुरुवात केली. संशयितांनी सुनील व मुलगा श्वेत याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात संशयितांपैकी एकाने सुनीलच्या डोक्यात तलवारीने मारून त्याला गंभीर जखमी केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Young man beaten up in Budhgaon