रेवणगावच्या श्री वेताळगुरूदेवाची यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:28 IST2021-04-09T04:28:16+5:302021-04-09T04:28:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विटा : रेवणगाव (ता. खानापूर) येथे गुढीपाडव्यादिवशी रात्री भरणारी ग्रामदैवत श्री वेताळगुरूदेवाची यात्रा कोरोनामुळे रद्द करण्याचा ...

Yatra of Shri Vetal Gurudeva of Revangaon canceled | रेवणगावच्या श्री वेताळगुरूदेवाची यात्रा रद्द

रेवणगावच्या श्री वेताळगुरूदेवाची यात्रा रद्द

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : रेवणगाव (ता. खानापूर) येथे गुढीपाडव्यादिवशी रात्री भरणारी ग्रामदैवत श्री वेताळगुरूदेवाची यात्रा कोरोनामुळे रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाच्या उपस्थितीत यात्रा समिती व ग्रामस्थांनी घेतला. त्यामुळे यात्रेच्या पार्श्वभूमीवर दि. ११ ते १४ एप्रिल या काळात होणारे सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसह कुस्ती मैदानही रद्द करण्यात आले असून, भाविकांना संपूर्ण प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

रेवणगाव येथे रात्री भरणारी व पहाटे संपणारी यात्रा म्हणून श्री वेताळगुरूदेवाची यात्रा सुप्रसिद्ध आहे.

सध्या कोरोनाची महामारी सुरू आहे. विटा शहरासह खानापूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी यात्रा न भरण्याचा निर्णय प्रशासनाच्या आदेशाने रेवणगाव येथील यात्रा समिती व ग्रामस्थांनी घेतला. त्यामुळे यावर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी रेवणगाव येथील ग्रामदैवत तीर्थक्षेत्र श्री वेताळगुरूदेव यात्रा रद्द करण्यात आली असून, भाविकांना दर्शनासाठी मंदिरही बंद ठेवण्यात येणार आहे. मंदिर परिसरात भाविकांना कोणत्याही प्रकारे प्रवेश दिला जाणार नसल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले.

Web Title: Yatra of Shri Vetal Gurudeva of Revangaon canceled