शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

जतमध्ये यल्लम्मा देवीच्या यात्रेस प्रारंभ

By admin | Updated: December 19, 2014 00:22 IST

लाखो भाविक दाखल : दर्शनासाठी स्वतंत्र दोन रांगांची व्यवस्था

जत : पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या जत येथील यल्लम्मादेवी यात्रेस आज गंधओटी कार्यक्रमाने प्रारंभ झाला. आज (गुरुवार) पहाटेपासून लिंब नेसणे व दंडवत घेणे या कार्यक्रमास भाविकांनी सुरुवात केली. त्यामुळे मंदिर परिसरात गर्दी झाली होती. देवस्थान समितीने स्वतंत्र दर्शन रांगा तयार करून भाविकांना मंदिराच्या गाभाऱ्यात उभे राहून दर्शन घेण्याची व्यवस्था केली आहे. यामुळे भाविकांना सुलभ दर्शन घेता येत आहे.यल्लम्मादेवी मंदिरापासून सुमारे शंभर मीटर अंतरावर बांधीव कुंड तयार करून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र गंध घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस लिंब नेसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेत व्यापारी, व्यावसायिक व फिरते विक्रेते यांची सुमारे दोन हजार पाचशे इतकी संख्या झाली आहे. भाविक, व्यापारी व व्यावसायिकांच्या सेवेसाठी पाच ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय, चार ठिकाणी तात्पुरते शौचालय, वीज पुरवठा आदी व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रा कालावधित कोणत्याही साथीच्या रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून पाण्यात जंतुनाशक मिसळले जात आहे. याशिवाय तात्पुरते प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण करून तेथे एक रुग्णवाहिका आणि वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रवासी भाविकांना ये-जा करता यावे यासाठी यात्रेत एसटी बसस्थानक सुरू करण्यात आले आहे. यात्रा कालावधित कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलीस व मंदिर परिसरात कॅमेरे बसवून त्यातील हालचालींवर नियंत्रण ठेवले जात आहे.याशिवाय जत शहरातील वाचनालय चौक ते छत्रीबागपर्यंतच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये म्हणून तेथे एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. यात्रेतील गैरसोय अथवा इतर माहितीसंदर्भात भाविकांनी यात्रा समिती कार्यालयात संपर्क साधावा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन यल्लम्मादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे यांनी केले आहे. (वार्ताहर)