शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मिरज पूर्वमध्ये विहिरींनी तळ गाठला

By admin | Updated: April 20, 2015 00:10 IST

नळ पाणी पुरवठ्यावर परिणाम : तलाव, पाणीसाठे भरून देण्याची मागणी

प्रवीण जगताप - लिंगनूर  मिरज पूर्व भागातील बेळंकी, लिंगनूर, खटाव या गावांतील नळांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. खालावलेल्या पाणी पातळीमुळे नियमित नळाचे पाणी मिळण्यास ‘ब्रेक’ बसू लागला आहे. बेळंकी येथील दोन्ही पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची पाणी पातळी घटली आहे. महिन्याभरापासून विस्कळीत व अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्येमुळे भागातील महिला व सामान्य जनतेचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल सुरू झाले आहेत. येथे चार-पाच दिवसांनंतर पाणी मिळत आहे, तर लिंगनूरचा मुख्य तलाव आटल्याने त्याखालील नळ पाणीपुरवठ्याच्या लिंगनूर व खटावच्या विहिरींचीही पाणी पातळी घटली आहे. सध्या या विहिरीत असणारे पाणी गाळाचे आहे व ते पिण्यायोग्य नाही. यंदा प्रथमच लिंगनूरमध्ये आठवड्यात दोन दिवस व पुन्हा रविवारी पाणी पुरवठा अपुरा झाला आहे.
तसेच लिंगनूर येथील यल्लम्मा मंदिर परिसरातील विहिरींचे पाणीही संपले आहे. दोन्ही विहिरींनी तळ गाठल्यामुळे कधी नव्हे ते पहिल्यांदाच येथील नळाद्वारे केला जाणारा पाणी पुरवठा अडचणीत आला आहे. विहिरीतील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे गावातील नळांनाही अपुरा पाणीपुरवठा होऊ लागला आहे. आठवड्यापासून कालव्या-उपकालव्यांतून म्हैसाळचे पाणी वाहू लागले आहे. वीज पडून म्हैसाळच्या युनिटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तीन दिवस योजना दुरूस्तीच्या कामात बंद झाली होती. मात्र आज पुन्हा योजना कार्यान्वित झाली आहे. या पाण्याचा अप्रत्यक्षरित्या लिंगनूर, बेळंकी येथील नळ पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची पाणी पातळी वाढविण्यासाठी कितपत फायदा होतो, याकडेही जनतेचे लक्ष आहे.
लिंगनूर मुख्य तलावात ‘म्हैसाळ’चे पाणी कधी? अशात लिंगनूर येथील मुख्य तलावावर कार्यरत असणाऱ्या काडदेव पाणी वापर संस्थेने काही प्रमाणात पाणीपट्टी जमा करून म्हैसाळ योजनेच्या पाण्याने तलाव भरून घेतल्यास आपोआपच त्याखाली असणाऱ्या व लिंगनूर गावाला नळ पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पाणी पातळी आपोआप वाढणार आहे.
खालावलेल्या पाणी पातळीचा खटाव गावाच्या विहिरीसही फटका बसला आहे. त्यामुळे या तलावात म्हैसाळचे पाणी कधी दाखल होणार, याकडे परिसराचे लक्ष आहे.


मोटारी जोडणाऱ्यांचा फटका सामान्यांना
एकीकडे पाणीटंचाईचा प्रश्न उभा ठाकला असताना नळाचे पाणी सोडल्यानंतर काही ग्राहकांकडून विद्युत मोटारी जोडून पाणी खेचले जात असल्याने सामान्य ग्राहकांना त्याचा फटका बसत आहे. अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा, त्यात मोटारी लावून पाणी घेतल्याने इतर नागरिकांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळेनासे झाले आहे. याचा विचार करून एक तर मुबलक पाणी पुरवठा झाला पाहिजे अथवा पाण्याचा साठा कमी असेल, टाकीत पाणीसाठा कमी असेल, तर किमान नळाला पाणी सोडण्याअगोदर विद्युत मंडळाशी संपर्क करून त्या अर्ध्या तासापुरता गावातील विद्युतपुरवठा सकाळी बंद केला पाहिजे. यामुळे जर ग्राहक विद्युत मोटार जोडून पाणी उपसत असल्यास त्याला आपोआप आळा बसेल व सर्वांना समान क्षमतेने पाणी मिळेल, अशी मागणी सर्वसामान्य लोकांतून होत आहे.


म्हैसाळ योजनेचे पाणी सोनुरे तलाव परिसरातून पुढे यल्लम्मा मंदिरापर्यंत पोहोचल्यास येथील विहिरीचे पाणी वाढणार आहे. त्यामुळे ही विहीर भरल्यानंतर लिंगनूरचा पाणी पुरवठा सुरळीत होईल. दोन्ही विहिरीत पाणीच नसल्याने आठवड्यातून तीन दिवस अपुरा पाणीपुरवठा झाला आहे. परंतु म्हैसाळ योजनेचे पाणी सोनुरे तलाव परिसरात आज पोहोचले आहे. उद्याअखेर ते यल्लम्मा मंदिर परिसरात पोहोचेल, त्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत करता येईल
- मारूती पाटील, उपसरपंच, लिंगनूर