शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

पाणीदर येणार तीन रुपयांवर

By admin | Updated: September 19, 2015 23:58 IST

महापौरांची माहिती : व्यावसायिक पाणीपट्टीत वाढीचा विचार

सांगली : महापालिकेच्या खासगीकरणावरून सध्या विरोधकांसह स्वकीयांनीही कॉंग्रेस नेत्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. अशातच महापौर विवेक कांबळे यांनी शनिवारी पाणीदर कमी करण्याची घोषणा केली. घरगुती पाणीदर प्रति हजार लिटर ८ रुपयांवरून ३ रुपयांवर आणण्यात येईल, मात्र व्यावसायिक पाणीपट्टी तसेच चुकवेगिरी करणाऱ्यांची पाणीपट्टी वाढविणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पाणी खासगीकरणासाठी सत्ताधारी काँग्रेस सरसावली असतानाच, काँग्रेसचाच एक घटक असलेल्या मदनभाऊ युवा मंचने खासगीकरणालाच विरोध दर्शविला आहे. या धोरणातील त्रुटींवरच त्यांनी बोट ठेवले आहे. युवा मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांच्या पाणीदराची कागदपत्रे गोळा करून आयुक्तांकडे सादर केली होती. राज्यात कोणत्याही महापालिकेचा दर सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेएवढा नाही. याठिकाणचा दर सर्वाधिक असल्यामुळे मीटर सुरू करून पाणी आकारणी चालू झाली, तर लोकांना प्रतिमाह ५०० रुपयांपर्यंत पाणीपट्टी येऊ शकते. त्यामुळे या दराने पाणीपट्टी परवडणारी नाही, असे मत मांडले होते. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा महसूल वाढला पाहिजे. पाणीगळती रोखून जादा पाणी वापर करणाऱ्यांवर अंकुश ठेवावाच लागेल. मात्र, या गोष्टी करताना प्रामाणिक ग्राहकांवर अन्याय होता कामा नये. मीटरप्रमाणे पाणी आकारणीस कोणाचाही विरोध नाही. मात्र त्यापूर्वी अन्य महापालिकांच्या पाणीदराचा विचार करून आपला पाणीदर कमी करावा, अशी मागणी मंचच्यावतीने करण्यात आली होती. महापौर कांबळे यांनी या गोष्टीची दखल घेत पाणीदर कमी करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे सांगितले. ते म्हणाले की, पाणीपुरवठा विभागाचे खासगीकरण होत असल्याचा आरोपच चुकीचा आहे. वास्तविक प्रायोगिक तत्त्वावर या गोष्टी आम्ही करीत आहोत. एकाच अपार्टमेंटमध्ये अनेक फ्लॅटधारक असतानाही किमान सरासरी पाणीपट्टी आकारण्यात येत आहे. त्याशिवाय हॉटेल व अन्य बड्या व्यावसायिकांनाही दोन महिन्याला ३२० रुपयेच पाणीपट्टी आकारली जात आहे. या गोष्टी रोखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. महसुलातील ही कोट्यवधी रुपयांची गळती थांबविण्याचा विचार आहे. त्यामुळे मीटरप्रमाणे पाणी आकारणी हा एक चांगला व व्यावहारिकदृष्ट्या योग्य पर्याय आहे. सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसणार नाही, याची दक्षता आम्ही घेत आहोत. त्यादृष्टीने प्रतिहजार लिटर पाणीदर ५ रुपयांनी कमी करून तो ३ रुपयांवर आणण्याचा विचार झालेला आहे. त्यादृष्टीने निर्णय घेतला जाईल. त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)