म्हैसाळचे पाणी कुकटोळीत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:25 IST2021-03-08T04:25:52+5:302021-03-08T04:25:52+5:30

ओळ : म्हैसाळ योजनेचे पाणी रविवारी दुपारी ३ वाजता कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथे पोहोचले. शिरढोण : म्हैसाळ उपसा सिंचन ...

The water of Mahisal enters the cistern | म्हैसाळचे पाणी कुकटोळीत दाखल

म्हैसाळचे पाणी कुकटोळीत दाखल

ओळ : म्हैसाळ योजनेचे पाणी रविवारी दुपारी ३ वाजता कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथे पोहोचले.

शिरढोण : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी रविवारी दुपारी ३ वाजता कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी येथे दाखल झाले. रात्री उशिरा ते बोरगावपर्यंत पाणी पोहचले होते. आवर्तन सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त हाेत आहे.

काही महिन्यांपासून म्हैसाळचे आवर्तन बंद होते. गेल्या काही दिवसांपासून पाणी सुरू करण्याची मागणी हाेत हाेती. मार्च महिन्याच्या सुरुवातीस म्हैसाळचे आवर्तन सुरू झाले आहे. म्हैसाळ योजनेचा पाचवा टप्पा कोंगनोळी कुकटोळी बेळंकीच्या मध्य भागातून सुरू होतो. पाचवा टप्पा हा कुकटोळीपासून सुरू होतो.

रविवारी दुपारी ३ वाजता कुकटोळी येथे पाणी पोहचले. रात्री उशिरापर्यंत देशिंग, बोरगावपर्यंत पाणी पोहचले. ऐन उन्हाळ्यात म्हैसाळ योजना सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कुकटोळी येथे पाणी पोहचताच कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: The water of Mahisal enters the cistern