शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

वाळेखिंडीत नागरिकांनीच अवैध व्यवसाय बंद पाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:23 IST

जत : वाळेखिंडी (ता. जत) येथील अवैध व्यवसायाच्या विरोधात तक्रार करूनही तो बंद करण्यास पोलिसांनी नकार दिल्यानंतर गावातील प्रतिष्ठित ...

जत : वाळेखिंडी (ता. जत) येथील अवैध व्यवसायाच्या विरोधात तक्रार करूनही तो बंद करण्यास पोलिसांनी नकार दिल्यानंतर गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन अवैध व्यवसाय बंद केले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेबद्दल नागरिकांतून नाराजी तर नागरिकांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

वाळेखिंडी गावातील पानटपरी, चहाटपरी व अतिक्रमण करून सुरू केलेल्या इतर काही ठरावीक दुकानातून बिनधास्तपणे अवैध व्यवसाय सुरू होते. ग्रामस्थांना हे खटकत होते. परंतु तक्रार होत नसल्यामुळे व्यावसायिक गैरफायदा घेत होते. गावातील मुख्य प्रवेशद्वार व एसटी पिकअप शेडसमोर असणाऱ्या मुख्य रस्त्यालगत हे व्यवसाय सुरू होते. याचा त्रास रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या महिलांना व नागरिकांना सहन करावा लागत होता.

माजी सरपंच एन. डी. शिंदे यांनी पोलीस निरीक्षक उत्तम जाधव यांना फोन करून व प्रत्यक्ष भेटून व्यवसाय बंद करण्याची मागणी केली होती. परंतु पोलिसांकडून काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे एन. डी. शिंदे, जत पंचायत समिती माजी उपसभापती व विद्यमान सदस्य शिवाजी शिंदे, विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष तानाजी शिंदे यांनी अवैध व्यावसायिकांना एकत्रित बोलावून घेतले. गावात शांतता राखण्यासाठी व्यवसाय बंद करण्याचा सज्जड दम दिल्यानंतर व्यावसायिकांनी अवैध धंदे बंद केले आहेत.

यापुढे अवैध व्यवसाय पुन्हा सुरू झाल्यास राज्याचे गृहमंत्री व जिल्हा पोलीस प्रमुखांना लेखी निवेदन देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन एन. डी. शिंदे यांनी केले आहे.