विजयकुमार दिवाण यांना टी. के. पाटील पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:32 IST2021-09-14T04:32:13+5:302021-09-14T04:32:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांना यंदाचा स्व. टी. के. पाटील टेक्नोक्रेट लाईफ टाईम ...

Vijaykumar Diwan to T. K. Patil Award announced | विजयकुमार दिवाण यांना टी. के. पाटील पुरस्कार जाहीर

विजयकुमार दिवाण यांना टी. के. पाटील पुरस्कार जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांना यंदाचा स्व. टी. के. पाटील टेक्नोक्रेट लाईफ टाईम ॲचिव्हमेंट पुरस्कार जाहीर झाला आहे. बुधवारी अभियंता दिनी (दि. १५) त्याचे वितरण होणार आहे. रोटरी क्लब ऑफ कृष्णा व्हॅलीचे अध्यक्ष जयजीत परितकर यांनी ही माहिती दिली. यावेळी सचिव वीरेंद्र पाटील, इंजिनिअर्स व आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र कोळसे, सचिव पंजाबराव मोरे, आभाळमाया फाउंडेशनचे प्रमोद चौगुले, राजेंद्र मेढेकर उपस्थित होते.

बुधवारी सायंकाळी सात वाजता असोसिएशनच्या सभागृहात अभियंता सचिन भुजबळ व महेश परमार यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान केला जाईल. सन्मानचिन्ह व रोख ८ हजार ८८८ रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. दिवाण यांनी कृष्णा नदी व पूर व्यवस्थापन या विषयात २५ वर्षांहून अधिक काळ काम केले आहे.

Web Title: Vijaykumar Diwan to T. K. Patil Award announced