आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक वामन काळे यांचे निधन

By संतोष भिसे | Updated: October 9, 2022 14:49 IST2022-10-09T14:48:11+5:302022-10-09T14:49:02+5:30

'आपली आवड'पासून 'प्रभातीचे रंग'पर्यंतचे अनेक कार्यक्रम लाखो श्रोत्यांनी त्यांच्या भारदस्त आणि सुमधूर आवाजात ऐकले.

Vaman Kale, retired news reporter of Akashvani passed away | आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक वामन काळे यांचे निधन

आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक वामन काळे यांचे निधन

सांगली : आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक वामन काळे (वय ७०) यांचे रविवारी सांगलीत निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. गेली अनेक वर्षे सांगली आकाशवाणी आणि वामन काळे हे अतुट समिकरण होते. आकाशवाणीच्या या आवाजाने एक काळ खूपच गाजवला होता. 

'आपली आवड'पासून 'प्रभातीचे रंग'पर्यंतचे अनेक कार्यक्रम लाखो श्रोत्यांनी त्यांच्या भारदस्त आणि सुमधूर आवाजात ऐकले. प्रसंगी अनेक साध्यासुध्या कार्यक्रमांची रंगतही त्यांच्या आवाजाने वाढायची. विविध क्षेत्रांचा सखोल अभ्यास, कार्यक्रमाच्या पाहुण्यांशी दिलखुलास संवाद साधण्याची हातोटी यामुळे संपूर्ण कार्यक्रमावर त्यांच्या निवेदनाची शेवटपर्यंत छाप रहायची. निवृत्तीनंतरही ते साहित्य, संस्कृती आदी क्षेत्रात कार्यरत होते. काही पुस्तके लिहिली. सांगलीच्या साहित्य वर्तुळात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांची मुलगी परदेशातून परतल्यानंतर सोमवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Web Title: Vaman Kale, retired news reporter of Akashvani passed away

टॅग्स :Sangliसांगली