शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत दिवसभरात ६०० जणांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:26 IST

सांगली : महापालिकेने ज्येष्ठ नागरिक व सहव्याधी व्यक्तींसाठी दहा आरोग्य केंद्रांतून कोविड लसीकरणाची सोय केली आहे. शुक्रवारी दिवसभरात ५३८ ...

सांगली : महापालिकेने ज्येष्ठ नागरिक व सहव्याधी व्यक्तींसाठी दहा आरोग्य केंद्रांतून कोविड लसीकरणाची सोय केली आहे. शुक्रवारी दिवसभरात ५३८ ज्येष्ठ नागरिक आणि ७१ सहव्याधी व्यक्तींचे कोरोना लसीकरण करण्यात आले. शहरातील अनेक मान्यवरांनीही कोरोनाची लस घेतली.

महापालिका क्षेत्रात ज्येष्ठ नागरिकांच्या कोविड लसीकरणास सोमवारपासून सुरुवात झाली. शहरात ७३ हजार ५५७ ज्येष्ठ नागरिक, तर ३२ हजार ३५८ सहव्याधी नागरिक आहेत. महापालिकेने दहा आरोग्य केंद्रांवर लसीकरणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. आरोग्य केंद्रामध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत लसीकरण करण्याची सोय आहे. जागेवरच ऑनलाइन नोंदणी करून तत्काळ लसीकरण केले जात आहे.

या लसीकरणाला महापालिका क्षेत्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी ६०० जणांचे लसीकरण झाले. आभाळमाया फौंडेशनचे आर्किटेक्ट प्रमोद चौगुले, उद्योजक श्रीकांत तारळेकर, रेड स्वस्तिक सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी लस घेतली. ही लस सुरक्षित असून, त्याचा कोणताही त्रास होत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही प्रमोद चौगुले यांनी केले. यावेळी रेड स्वस्तिक सोसायटीचे स्वयंसेवकही उद्यापासून आरोग्य केंद्रावर कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी येणार असल्याचे सांगण्यात आले.