महापालिका क्षेत्रात २३९३ ज्येष्ठांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:23 IST2021-03-07T04:23:48+5:302021-03-07T04:23:48+5:30

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात १ मार्चपासून सुरु केलेल्या मोहिमेत सहा दिवसात २,३९३ ज्येष्ठांचे लसीकरण ...

Vaccination of 2393 senior citizens in the municipal area | महापालिका क्षेत्रात २३९३ ज्येष्ठांचे लसीकरण

महापालिका क्षेत्रात २३९३ ज्येष्ठांचे लसीकरण

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात १ मार्चपासून सुरु केलेल्या मोहिमेत सहा दिवसात २,३९३ ज्येष्ठांचे लसीकरण करण्यात आले. तर कोमॉरबिडिटीच्या २७७ व्यक्तिंनाही कोरोना लस देण्यात आली.

महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या टीमकडून लसीकरणाचे काम सुरु आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, आरोग्य अधिकारी डॉ, सुनील आंबोळे आणि त्यांच्या वैद्यकीय टीमकडून महापालिकेच्या १० आरोग्य केंद्रांमधून १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिक आणि कोमॉरबिडिटी व्यक्तिंना कोरोना लसीकरणाचे काम सुरु केले आहे. सहा दिवसातच महापालिका क्षेत्रातील २,३९३ ज्येष्ठांचे तर २७७ कोमॉरबिडिटी व्यक्तिंना लस देण्यात आली. महापालिका क्षेत्रात साधारण सव्वालाखाच्या आसपास लसीकरण केले जाणार आहे.

सर्वच आरोग्य केंद्रांमध्ये रजिस्ट्रेशनपासून ते लस देईपर्यंत सर्व सुविधा देण्यात येत आहेत. त्यामुळे कोणताही भीती न बाळगता ज्येष्ठांनी लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.

Web Title: Vaccination of 2393 senior citizens in the municipal area