शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI च्या विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

‘साई’चे सूत्रधार पडद्यामागे

By admin | Updated: May 25, 2015 00:24 IST

इस्लामपुरात संतापाची लाट : स्थानिक तरुणांना अडकविण्याचा प्रयत्न

इस्लामपूर : ‘लोकमत’ने साई एन्टरप्रायझेसच्या भूलभुलैया योजनेचा पर्दाफाश केल्यानंतर, यामध्ये पैसे गुंतविलेल्या सुशिक्षित बेरोजगारांनी पैसे परत मिळविण्यासाठी ‘साई’च्या कार्यालयाकडे धाव घेतली. परंतु मुख्य सूत्रधार मात्र पडद्यामागेच असून येथे असलेल्या एका कर्मचारी मुलीशी संपर्क साधला असता, ‘आमचे सर येतील’, असे उत्तर देऊन युवकांची बोळवण केली जात आहे.साई एन्टरप्रायझेसच्या सूत्रधारांनी स्थानिक वृत्तपत्रातून परिपत्रक टाकले होते. यामध्ये शहरातील सुशिक्षित बेरोजगारांना, घरबसल्या ३ हजार रुपये मिळवा, अशी जाहिरात केली होती. ही जाहिरात वाचून अनेक बेरोजगार युवक, युवती व महिला या योजनेकडे आकर्षित झाल्या. दरम्यान, या कार्यालयातील कामकाज पाहण्यासाठी स्थानिक बारावी ते पदवीधर असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी देण्यात आली होती. स्थानिक विद्यार्थ्यांच्या ओळखीचा फायदा घेऊन त्यांच्या परिसरातील सुशिक्षित बेकार युवक—युवतींना या योजनेमध्ये सामील करुन घेऊन लाखो रुपयांचा घोटाळा केला आहे.हे कार्यालय आझाद चौकातील एका इमारतीच्या तळघरात छोट्याशा जागेत आहे. तेथे कोणत्याही प्रकारचा फलक नाही. व्यवसाय करण्याचा परवानाही नाही. याठिकाणी इंग्रजी माध्यमातून शिकलेली मुलगी कामावर आहे. बसस्थानक परिसरातील सिध्दनाथ हॉलच्या मालकांशी संपर्क साधला असता, १५ ते २0 दिवसात येथे कोणताही सेमिनार झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)उडवाउडवीची उत्तरे देऊन बोळवणया कार्यालयास आमच्या प्रतिनिधीने भेट दिली असता, ही मुलगी येणाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन परत पाठवत होती. परंतु ज्यांनी या योजनेतील ग्रंथ पुनर्लिखित केले आहेत, ते ग्रंथ जमा करण्यासाठी येत आहेत. तसेच अनेकजण पैसे मागण्यासाठी येत आहेत. एकूणच, यातील सूत्रधार नामानिराळा राहिला असून स्थानिक नोकरी करणारेच यामध्ये भरडले जात आहेत.