शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
3
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
4
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
5
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
6
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
7
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
8
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
9
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
10
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
11
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
12
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
13
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
14
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
15
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
16
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
17
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
18
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
19
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
Daily Top 2Weekly Top 5

दिघंचीजवळ अपघातात दोन ठार

By admin | Updated: May 3, 2015 00:57 IST

आठजण गंभीर : खासगी बसची ट्रॅक्टरला धडक

दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) गावाच्या पश्चिमेस तीन किलोमीटरवर मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावरील पळसखेल फाट्याजवळ ट्रॅक्टर ट्रॉलीवर खासगी आराम बस आदळल्याने दोघे ठार, तर आठजण गंभीर जखमी झाले. अर्जुन राधाकृष्ण लाड (वय ३०, रा. परतवाडी (तोडा), ता. परतूर, जि. जालना) व हिराबार्ई चंद्रकांत पळसे (४०, वाठार, ता. फलटण, जि. सातारा) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना शनिवारी सकाळी आठ वाजता घडली. मल्हारपेठ-पंढरपूर रस्त्यावर सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान, मुंबईहून दिघंचीकडे भरधाव वेगाने प्रवासी आराम बस (एमएच -०४ जी ७८७५) येत होती, तर माणगंगा कारखान्याचा ऊस आणण्यासाठी दिघंची येथील धनंजय महाडिक यांच्या मालकीचा ट्रॅक्टर (एमएच १० एवाय ५०९) दिघंचीहून पुसेसावळी येथे चालला होता. ट्रॅक्टर चालकाने समोरून भरधाव वेगाने बस येत असल्याचे पाहून ट्रॅक्टर रस्त्यावरून खाली घेतला. मात्र, बसचालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर आराम बस आदळली. या अपघातात ट्रॉलीमधील ऊसतोड कामगार अर्जुन लाड जागीच ठार झाला, तर त्याची पत्नी ट्रॉलीमधून रस्त्यावर आदळल्याने जखमी झाली. बसमधील नऊजण गंभीर जखमी झाले. त्यातील हिराबार्ई पळसे या महिलेचा उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. जखमींमध्ये कुमार बापूराव दालपे (३५), विजय रमेश पिसे (१४), संगीता औदुंबर पिसे (३०), आशाबाई रमेश पिसे (३०), नंदकुमार कोंडीबा पिसे (३३, सर्व रा. पिसेवाडी, ता. आटपाडी), शोभा सुभाष गायकवाड (२१, रा. पिंपरी, पुणे), तृप्ती राजू पळसे (८, पळशी), योगिता अर्जुन लाड (२५, परतूर तोडा-जालना) यांचा समावेश आहे. बसची धडक एवढी जोरदार होती की, चालकाच्या बाजूचा पत्रा पूर्ण फाटल्याने आतील प्रवासी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. खासगी वाहनांमधून जखमींना आटपाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच आटपाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सदाशिव शेलार पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले, तर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. सावंत यांनी जखमींना तातडीने आटपाडी येथे हलविले.(वार्ताहर)