शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

दिघंचीत बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:26 IST

दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथे बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होत आहे. सर्वसामान्य नागरिक व वाहनचालक या त्रासाला ...

दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथे बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होत आहे. सर्वसामान्य नागरिक व वाहनचालक या त्रासाला चांगलेच कंटाळले आहेत. सध्या दिघंचीत मल्हारपेठ-पंढरपूर व दिघंची हेरवाड या राज्य मार्गाचे काम सुरू आहे. काम सुरू असल्याने रस्त्यावर धुळीचे साम्राज्य होत आहे.

एकीकडे धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे तर दुसरीकडे बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होत आहे. बसस्थानक परिसरात गटारीचेही काम अपूर्ण आहे. त्याचबरोबर दुचाकी रोडवर उभ्या केल्याने वाहतूक कोंडी होत आहे.

दिघंची बसस्थानकापासून माणगंगा नदीवरील पुलापर्यंत, आटपाडी रोड- पडळे मॉल ते पेट्रोल पंप परिसर या ठिकाणापर्यंत वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. बसस्थानक परिसरात फळविक्रेते रस्त्यावरच ठाण मांडून असल्याने या ठिकाणी बेशिस्त पार्किंग होत आहे.

दिघंची आटपाडी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. शिवाय सातारा व सोलापूर जिल्ह्यातील नागरिकही बाजारसाठी दिघंचीत येत असतात. रविवारी दिघंचीचा बाजार असल्याने मोठ्या प्रमाणात शहीद भगतसिंग चौक दिघंची हायस्कूल परिसर ते बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडी होत असते. या ठिकाणची बेशिस्त पार्किंग हटवून वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे

फोटो-३१दिघंची३

फोटो ओळी:- दिघंची (ता. आटपाडी) येथे रविवारी बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.