सांगली जिल्हा कारागृहामध्ये फेकला गांजाचा बटवा, तिघांवर गुन्हा दाखल

By शरद जाधव | Updated: November 18, 2023 15:59 IST2023-11-18T15:59:18+5:302023-11-18T15:59:37+5:30

गांजा फेकणाऱ्यांचा शोध सुरू

Throwing ganja in Sangli district jail, case registered against three | सांगली जिल्हा कारागृहामध्ये फेकला गांजाचा बटवा, तिघांवर गुन्हा दाखल

सांगली जिल्हा कारागृहामध्ये फेकला गांजाचा बटवा, तिघांवर गुन्हा दाखल

सांगली : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिल्हा कारागृहात बाहेरच्या बाजूने गांजा फेकण्यात आल्याचा प्रकार घडला. यावेळी गस्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यानुसार बाहेरून गांजा असलेला बटवा फेकणारा हरिष माहिते तसेच कारागृहातील बंदी सोहेल दिलावर शेख आणि तुषार महेश भिसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारागृह प्रशासनाने सांगली शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

 शुक्रवारी पुन्हा एकदा कारागृहात गांजा सदृश्य पाला आणि दगड असलेला लहान बटवा फेकण्यात आला. नेमका हा प्रकार झाला त्यावेळी कर्मचारी गस्तीवर होते. बटवा उचलत असतानाच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. कारागृहामधील असलेले तट क्रमांक २ आणि ३ च्या मधोमध असलेल्या विभक्त कोठडीच्या समोर बंदी सोहेलचा मित्र हरिष मोहिते याने आरोपी सोहेल शेख आणि तुषार भिसे यांच्याकरिता गांजा सदृश्य पाला व बटवा कारागृहामध्ये फेकला. याबाबत कारागृह शिपाई माधव रामराव सोमवंशी यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Throwing ganja in Sangli district jail, case registered against three