शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मिरज पश्चिम भागात जोमाने ऊसतोडी

By admin | Updated: November 23, 2014 23:52 IST

दराचा प्रश्न कायम : राजकारणात आंदोलन गुंडाळल्याची चर्चा

कसबे डिग्रज : गेली कित्येक वर्षे गळीत हंगामाची सुरुवात ऊसदर आंदोलनाने होत होती. रास्ता रोको, ट्रॅक्टर, उसाच्या गाड्यांच्या टायर फोडणे, जाळपोळ, पोलीस रस्त्यांवर... यासह पंधरवडा घुमत होता. पण राज्यात सरकार बदलले, शेतकरी संघटनेच्या नेत्यांची बोटचेपी भूमिका आणि शेतकऱ्यांना साखरसम्राटांनी गतवर्षी दिलेला त्रास, अशा विविध प्रकारच्या राजकारणात ऊसदर आंदोलन गुंडाळल्याची चर्चा असून परिसरात सुमारे ९० टोळ्या ऊसतोडी जोमाने करीत आहेत.
ऊसदर आंदोलनासाठी राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना, शरद जोशीप्रणित संघटना, रघुनाथदादा पाटील यांची शेतकरी संघटना यांची ऊसदरासाठी मोठी आंदोलने होत होती. खा. राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत जोमदारपणे रान तापवत होते. काहीवेळा साखर कारखानदार, प्रसारमाध्यमे, सरकारचे प्रतिनिधी यांच्यातील बैठकीत सर्वसाधारण तोडगा काढून ऊसतोडी सुरू होत होत्या. यावर्षी ऊसदर नियामक मंडळाच्या बैठका होत आहेत.
यावर्षी जयसिंगपूर येथील ऊस परिषदेमध्ये बोटचेपी भूमिका घेऊन खा. राजू शेट्टी यांनी गतवर्षीपेक्षा इतिहासात प्रथमच २७०० रुपये अशी कमी मागणी केली. त्याचवेळी ऊस उत्पादकांमध्ये खा. राजू शेट्टींच्या भूमिकेबद्दल ‘शंकेची’ स्थिती निर्माण झाली. त्यानंतर कोणत्याही मोठ्या आंदोलनाशिवाय किंवा मोठ्या बैठकीशिवाय विनासायास साखर कारखाने सुरू झाले. कोणीही पहिला हप्ता जाहीर केला नाही, असे प्रथमच घडले. रघुनाथदादा पाटील आणि मनसेने ३५०० रुपयांची मागणी केली होती. पण त्यांचा जोर अपुरा पडला आहे. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एफआरपी द्यावी लागेल, असे जाहीर केले आहे. ती साधारणपणे २५०० रुपयांपर्यंत आहे.
गतवर्षी पंतप्रधानांसोबत होणारी बैठक हे ऊसदर आंदोलनाचे फलित होते. एवढा हा प्रश्न गाजला होता. पण खा. राजू शेट्टी आपल्या भूमिकेवर ठाम होते. यावर्षी त्यांनी अशी बोटचेपी भूमिका का घेतली? असा प्रश्न ऊस उत्पादकांना पडला आहे. का ऊसतोडी झाल्यानंतर आंदोलन करणार, अशी स्थिती आहे? (वार्ताहर)

नियामक मंडळाकडे लक्ष
रघुनाथदादा पाटील, खा. राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत ऊस आंदोलनात रान तापवत होते. काहीवेळा साखर कारखानदार, प्रसारमाध्यमे, सरकारचे प्रतिनिधी यांच्यातील बैठकीत तोडगा काढून ऊसतोडी सुरू होत होत्या. यावर्षी ऊस दर नियामक मंडळाच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.