शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

गतवर्षी बांधलेल्या बंधाऱ्यांची चौकशी करणार

By admin | Updated: June 8, 2015 00:51 IST

चंद्रकांत पाटील : २६६ कोटी ५९ लाखाच्या जिल्हा वार्षिक योजना आराखड्यास मंजुरी

सांगली : गतवर्षी कृषी विभागाच्यावतीने जिल्ह्यात बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यास चालू वर्षासाठी २६६ कोटी ५९ लाख रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजना आराखड्यास मान्यताही देण्यात आली. यावेळी खा. संजयकाका पाटील, खा. राजू शेट्टी, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, आ. शिवाजीराव नाईक, सुरेश खाडे, विलासराव जगताप, सुधीर गाडगीळ, अनिल बाबर, सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, पोलीस अधीक्षक सुनील फुलारी, महापालिका आयुक्त अजिज कारचे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, सहायक जिल्हाधिकारी अभिजित राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रमोद केंभावी आदी उपस्थित होते. गतवर्षी शेकड्यांनी कृषी विभागाच्यावतीने बंधारे बांधण्यात आले. याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. आमदारांनीही हे बंधारे निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. याची दखल घेत आता या सर्व बंधाऱ्यांची चौकशी करण्यात येईल. यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणाही यावेळी त्यांनी केली. पालकमंत्री पाटील म्हणाले की, सांगली जिल्ह्याकरिता २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी मान्यता देण्यात आलेल्या २६६ कोटी ५९ लाखाच्या तरतुदीमध्ये सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी १९८ कोटी ५० लाख, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी ६७ कोटी ४ लाख आणि ओटीएसपीसाठी १ कोटी ४ लाख ५६ हजाराच्या निधीचा समावेश आहे. गतवर्षी जिल्ह्यात सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेमध्ये १७४ कोटी ७५ लाखाचा निधी खर्च करण्यात आला होता. खर्चाची ही टक्केवारी ९९.८७ इतकी आहे. तसेच अनुसूचित जाती उपयोजनेमध्ये ३९ कोटी ३२ लाख ६५ हजाराचा खर्च करण्यात आला होता, खर्चाची ही टक्केवारी ९९.४१ टक्के इतकी आहे. तसेच ओटीएसपीमध्ये ७१ लाख ५९ हजार इतका खर्च करण्यात आला होता, खर्चाची ही टक्केवारी ७०.६३ इतकी आहे. अशी माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)जलयुक्त शिवारसाठी २४ कोटी नजीकच्या काळात गावा-गावात जलसाठे निर्माण करून टंचाईमुक्त गावे निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात या अभियानातून १४१ गावे निवडण्यात आली असून याठिकाणी कामेही सुरु आहेत. यासाठी जिल्हा नियोजन समितीतून २४ कोटीचा निधी देण्यात आला आहे. अन्य उपाययोजनांतून अधिकाधिक निधी उपलब्ध करुन हे अभियान यशस्वी करण्याचा प्रयत्न आहे. याशिवाय जिल्हा नियोजन समितीतून २ एक्साव्हेटर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यावर्षी ही कामे करणारतुरची पोलीस प्रशिक्षण केंद्राला आर. आर. पाटील यांचे नाव देणारनावीन्यपूर्ण योजनांसाठी ७ कोटीचा निधी उपलब्ध तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यात ७ प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपाहारगृह दोन एक्साव्हेटरपालिकांना गॅस शवदाहिनी माई घाट, कृष्णा घाट परिसराचे सुशोभिकरणरिमांड होममधील मुलांसाठी वॉटर गिझर व सोलर पॅक तासगाव तहसील कार्यालयात फायलिंगसाठी कॉम्पॅक्टर आरवडे येथे ई-लर्निंग आणि डिजिटल क्लासरुम, बालभवन विज्ञान केंद्र