शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
5
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
6
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
7
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
8
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
9
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
10
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
11
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
12
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
13
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
14
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
15
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
16
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
17
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
18
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
19
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
20
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ सहा कोटी ‘सांगली अर्बन’चेच

By admin | Updated: November 16, 2016 00:31 IST

गणेश गाडगीळ : कागदपत्रे दाखवून रक्कम ताब्यात घेऊ

सांगली : तुळजापूर (जि. उस्मानाबाद) येथे निवडणूक अधिकाऱ्यांनी केवळ संशयावरून ताब्यात घेतलेली सहा कोटींची रक्कम सांगली अर्बन बँकेचीच आहे. त्यात अनधिकृत काहीही नाही. ही रक्कम फक्त बँकेची मालमत्ता असून, सर्व कागदपत्रांच्या तपासणीनंतर ही रक्कम लवकरच बँकेच्या ताब्यात येईल, अशी माहिती सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली. बँकेची सहा कोटींची रक्कम तुळजापुरात ताब्यात घेण्यात आली आहे. त्याबाबत गाडगीळ बोलत होते. ते म्हणाले की, सांगली अर्बन बँकेच्या राज्यातील दहा जिल्ह्यांत ३५ शाखा आहेत. त्यापैकी नऊ शाखा मराठवाड्यात आहे. मुख्य कार्यालयात रोख रक्कम विभाग स्वतंत्रपणे कार्यरत आहे. ज्या शाखांना दररोजच्या व्यवहारासाठी रोख रक्कम लागते, त्या शाखांना या विभागामार्फत ती पुरवली जाते. ज्या शाखांकडे अतिरिक्त रक्कम असते, त्यांच्याकडून ती या विभागाकडे आणली जाते. याप्रमाणे दररोज व्यवहार होत असतात. रिझर्व्ह बँकेने ८ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या आदेशानुसार ५००, १००० च्या नोटा चलनातून रद्द झाल्या आहेत. १० तारखेपासून मोठ्या प्रमाणात रोख स्वरुपात रक्कम बँकांकडे जमा होत आहे. मराठवाड्यातील नऊ शाखांमध्येही मोठ्या प्रमाणात रकमेचा भरणा झाला आहे. संबंधित शाखांच्या क्षेत्रातील करन्सी चेस्ट असलेल्या राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनी एकदम रक्कम स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली. एवढी मोठी रक्कम शाखेत ठेवणे जोखमीचे असल्याने पूर्वापार पद्धतीप्रमाणे मराठवाड्यातील परभणी, माजलगाव येथील शाखांची कॅश मुख्य कार्यालयाकडे बँकेच्या वाहनाने बँकेचे अधिकृत चालक, इतर कर्मचारी यांच्यामार्फत आणण्याचे ठरले. त्यानुसार १४ रोजी परभणीतील तीन कोटी, माजलगाव शाखेतील तीन कोटी अशी सहा कोटींची रक्कम मुख्य कार्यालयाकडे भरणा करण्यासाठी आणली जात होती. परभणीच्या एक हजारच्या दहा हजार नोटा, ५०० च्या ४० हजार नोटा, माजलगाव शाखेतील ५०० च्या ४८ हजार, १०० च्या ६० हजार नोटा होत्या. सांगलीत शंभरच्या नोटांचा तुटवडा असल्याने माजलगाव शाखेतील अतिरिक्त शंभर रुपयाच्या ६० लाख रकमेच्या नोटा मागवल्या होत्या. ही रक्कम आणताना बँकेचे वाहन १४ रोजी तुळजापूर येथे निवडणूक अधिकाऱ्यांनी संशयाने ताब्यात घेतले. यासर्व नोंदी शाखांच्या कॅशबुकमध्ये आहेत. मुख्य कार्यालयातील डे बुकमध्ये ही रक्कम पेंडिंग दिसते. अधिकाऱ्यांना कागदोपत्री पटवून ही रक्कम लवकरच ताब्यात येईल, असेही गाडगीळ म्हणाले. (प्रतिनिधी) आमदारांचा संबंध नाही तुळजापुरात निवडणूक अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेली सहा कोटीची रक्कम सांगली अर्बन बँकेची आहे. काहीजणांनी कारण नसताना या गोष्टीचा भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्याशी संबंध जोडला आहे. या रकमेशी आमदारांचा काय संबंध? ही रक्कमच बँकेची मालमत्ता आहे. ही रक्कम आणताना कायदेशीर सर्व नियम पाळूनच आणली जात होती, असा खुलासा गणेश गाडगीळ यांनी केला.