शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

सावळजच्या चोरीचा छडा; घरफोड्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : वर्षभरापूर्वी सावळज (ता. तासगाव) येथील बंद घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्यास स्थानिक गुन्हे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : वर्षभरापूर्वी सावळज (ता. तासगाव) येथील बंद घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. बबलू पपलू शिंदे (वय २२, रा. खंडकी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून ५७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील गुन्ह्यांचा तपास करून गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक सांगली शहरात गस्तीवर हाेते. यावेळी माधवनगर रोडवरील बायपास रोडलगत असलेल्या बंद पंपाजवळ संशयित थांबल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकून बबलू यास ताब्यात घेतले. त्याच्याजवळ ५७ हजार ५०० रुपयांचे दागिने मिळून आले. यावेळी त्याने वर्षाभरापूर्वी सावळज येथील बंद घर फोडून दागिने चोरल्याचे पोलिसांना सांगितले. त्याच्याकडून ३० हजार ररुपये किमतीचे गंठण, २० हजार रुपये किमतीची सोन्याची टिक, साडेसात हजार रुपयांचे पैंजण असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप ढेरे, संदीप गुरव, संदीप नलावडे, जितेंद्र जाधव, ऊर्मिला खोत आदींच्या पथकाने ही कारवाई केली.