शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत महापौरपद खुले; इच्छुकांची संख्या मोठी, नेत्यांची डोकेदुखी वाढली; कुणाची नावे चर्चेत..वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 13:57 IST

महापौरपदासाठी भाजप अंतर्गत स्पर्धा तीव्र होण्याची चिन्हे

सांगली : सांगली- मिरज- कुपवाड महापालिकेचे महापौरपद यंदा सर्वसाधारण झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. महापालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या भाजपमध्ये महापौरपदासाठी इच्छुकांची संख्या वाढली असून, अंतर्गत गटबाजी उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपकडून धीरज सूर्यवंशी, निरंजन आवटी, रोहिणी पाटील आणि संतोष पाटील यांची नावे सध्या चर्चेत आहेत. स्पष्ट बहुमत कोणालाच मिळाले नसल्याने सत्तेसाठीही गोची झाल्याचे चित्र आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. भाजप हा सर्वात मोठा पक्ष असून त्यांचे संख्याबळ ३९ आहे. भाजपला बहुमतासाठी एका जागेची आवश्यकता आहे. काँग्रेसचे १८, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला १६, राष्ट्रवादी (शरद पवार) ३ तर शिंदेसेनेला २ जागा मिळाल्या. भाजपने सत्ता स्थापनेसाठी शिंदेसेनेशी चर्चा सुरू केली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांना फोनही केला होता. पण युतीचा निर्णय मुंबईत होणार आहे. 

दुसरीकडे स्थायी समिती सभापतिपदाचा पेच वाढला आहे. महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजपला राष्ट्रवादी (अजित पवार) गटाला सोबत घ्यावे लागणार आहे. दरम्यान, भाजपने राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या दोन नगरसेवकांशी संपर्क साधला आहे. अजित पवार गटाशी युती केल्यास संख्याबळानुसार महापालिकेतील सत्तेत वाटा द्यावा लागणार आहे. उलट शरद पवार गटाशी समझोता भाजपसाठी फायदेशीर ठरणार आहे.

गुरुवारी मुंबईत मंत्रालयात महापौरपदासाठी आरक्षण सोडत झाली. महापौरपद खुले झाल्याने राजकीय हालचाली वाढल्या आहेत. भाजपचे माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, स्थायी समितीचे माजी सभापती निरंजन आवटी, सलग तीनदा निवडून आलेल्या रोहिणी पाटील यांची नावे चर्चेत आहेत. ऐनवेळी इच्छुकांची संख्या वाढणार असल्याने महापौर निवडीत नेत्यांची कसरत होणार आहे.

सूर्यवंशी की आवटी?

गत सत्ताकाळात भाजपने धीरज सूर्यवंशी यांना महापौरपदाची उमेदवारी दिली होती. तेव्हा राज्यात महाआघाडीचे सरकार होते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील होते. राष्ट्रवादीने भाजपविरोधात मोर्चेबांधणी करून सात नगरसेवकांना फोडले होते. त्यामुळे अटीतटीच्या लढती सूर्यवंशी यांचा पराभव झाला होता. सूर्यवंशी यांच्यासह निरंजन आवटी हेही इच्छुक होते. पण नेत्यांनी आवटी यांची समजूत काढून सूर्यवंशींना महापौरपदाच्या मैदानात उतरविले होते. आता महापौरपदासाठी सूर्यवंशी व आवटी हे दोघेही प्रमुख दावेदार राहणार आहेत. त्यापैकी कुणाला संधी मिळते, याची उत्सुकता आहे.

रोहिणी पाटील यांचे नाव चर्चेत

तिसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या रोहिणी पाटील यांचे नावही महापौरपदाच्या शर्यतीत आहे. रोहिणी पाटील या भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या भगिनी आहेत. तसेच कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक व आमदार अमल महाडिक यांच्या चुलत भगिनी आहेत. त्यामुळे पाटील यांच्यासाठी महाडिक कुटुंबीयाकडून मुख्यमंत्र्यासह पक्षश्रेष्ठीकडे आग्रह धरला जाऊ शकतो.

पक्षांतर्गत संघर्ष तीव्र

महापौरपदासाठी भाजप अंतर्गत स्पर्धा तीव्र होण्याची चिन्हे असून, पक्षामधील गटबाजी उघडपणे समोर येण्याची शक्यता आहे. इच्छुकांची संख्या आणि समीकरणे पाहता, निर्णय प्रक्रिया कठीण ठरणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी वाटपावरून पक्षांतर्गत संघर्ष निर्माण झाला होता. पण तो जाहीर व्यासपीठावर आणण्याचे भाजपने टाळले होते. तरीही प्रचारात गटबाजी दिसून येत होती. या पार्श्वभूमीवर भाजपमधील मतभेद मिटवण्यासाठी आणि सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Mayor Post Open; Many Aspirants, Leaders' Headache Increases

Web Summary : Sangli's mayor post is now open, sparking political activity. BJP faces internal competition with multiple candidates. Factions may surface amid power struggles. Key names in discussion include Dheeraj Suryavanshi, Niranjan Awati, Rohini Patil, and Santosh Patil. Coalition talks are ongoing for majority.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६SangliसांगलीMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६MayorमहापौरBJPभाजपा