लाॅन्ड्री व्यवसाय अत्यावश्यक सेवेत घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:25 IST2021-04-11T04:25:37+5:302021-04-11T04:25:37+5:30

शिराळा : डॉक्टर, परिचारिका, सर्व शासकीय अधिकारी व पोलीस यंत्रणा, राजकीय नेते या सर्वांना सेवा देणारा लाॅन्ड्री व्यवसाय आहे. ...

Take the laundry business into essential service | लाॅन्ड्री व्यवसाय अत्यावश्यक सेवेत घ्या

लाॅन्ड्री व्यवसाय अत्यावश्यक सेवेत घ्या

शिराळा : डॉक्टर, परिचारिका, सर्व शासकीय अधिकारी व पोलीस यंत्रणा, राजकीय नेते या सर्वांना सेवा देणारा लाॅन्ड्री व्यवसाय आहे. निवासी रुग्णालयांमध्ये कपडे तसेच दैनंदिन वापरातील कपडे ही जीवनावश्यक बाब आहे. त्यामुळे कपडे स्वच्छ व इस्त्री करून देणाऱ्या लाॅन्ड्री व्यवसायाचा समावेश अत्यावश्यक सेवेत करावा अशी मागणी तालुका परीट समाजाच्या वतीने अध्यक्ष रवी यादव यांनी केली आहे.

या व्यवसायाचा अत्यावश्यक सेवेत समावेश केल्यास लॉन्ड्री व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांचा उपजीविकेचा प्रश्न सुटेल. तालुक्यातील ९५ टक्के लॉन्ड्री व्यवसाय हा भाड्याने घेतलेल्या दुकानात चालतो. गेल्या वर्षीपासून कोरोना नियमावलीचे पालन करत असल्याने दुकानाचे भाडे देखील थकले आहे. शासनाने जाहीर केलेल्या नियमानुसार लॉन्ड्री व्यवसाय सुरू ठेवला जाईल. याबाबत लवकरच जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार यांना समक्ष भेटून चर्चा करणार आहे. प्रसंगी परीट बांधवांना एकत्र करून निवेदन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दळवी, गणेश यादव, सुनील यादव, नितीन यादव, सचिव यादव, सदस्य जयसिंग परिट, राहुल यादव, अविनाश यादव, शामसुंदर यादव, अनिल यादव, प्रदीप यादव, महेश रसाळ, अशोक परीट, अविनाश दळवी उपस्थित होते.

Web Title: Take the laundry business into essential service